पुणे - सिंहगड रस्त्यावरून स्वारगेटकडे जाण्यासाठी शिवा काशीद चौक ते हिंगणे या दरम्यानचा उड्डाणपुलाचे अंतिम टप्प्यातील काम शिल्लक असल्याने १५ ऑगस्ट रोजीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम लांबणीवर पडला आहे. त्याचा फटका आणि राजभवन ते इ स्क्वेअर या दरम्यानच्या उड्डाणपुलाच्या उद्घाटनाला बसला आहे. हे दोन्ही उड्डाणपूल सुरु होण्यास आणखी किमान १० दिवस लागणार आहेत.