Pune News : सरदार पटेल रुग्णालयातील स्पेशलिटी व क्रिटिकल केअरसहीत विविध सुविधांचे उद्घाटन

स्फेरूल फाउंडेशन, कोटक महिंद्रा बँक आणि सीपीआर ग्रुप यांच्या आर्थिक सहाय्याने नवजात शिशु अतिदक्षता विभागाची स्थापना केली
Inauguration Sardar Patel Hospital facilities including specialty and critical care pune
Inauguration Sardar Patel Hospital facilities including specialty and critical care puneSakal

कँटोन्मेंट : पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल कॅन्टोन्मेंट स्पेशलिटी आणि क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये ऍडव्हान्स्ड कार्डियाक सेंटर, प्रधानमंत्री जन औषधी केंद्र, नवजात शिशु अतिदक्षता विभाग आणि लिक्विड मेडिकल ऑक्सिजन टँक या नव्या विकसित सुविधांचे उद्घाटन आज सोमवारी(ता.२१) लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग दक्षिणी कमांड आणि के.जे.एस चौहान प्रधान निदेशक रक्षा संपदा (दक्षिण कमान) यांच्या हस्ते झाले.

मेजर जनरल राजेंद्र जोशी दक्षिणी कमांड, सौरव रे, अमोल जगताप,प्रसाद चव्हाण, नवेंद्र नाथ-निदेशकगण दक्षिण कमांड, एस.प्रभाकरन उप-निदेशक दक्षिण कमांड, ब्रिगेडियर संदीप वासुदेवा, पुणे कँटोन्मेंट बोर्ड सीईओ सुब्रत पाल, संयुक्त सीईओ डॉ.नितीश गुप्ता, रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. उषा तपासे, उपाध्यक्ष सचिन मथुरावाला नामनिर्देशित सदस्य आणि पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे आदी अधिकारी यांच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ पार पडला.

कॅथ लॅब आणि सहा बेडेचे कार्डियाक केयर युनिटचा समावेश असलेले कार्डियाक केयर युनिट सार्वजनिक खाजगी भागीदारी मोडवर स्थापित केले आहे. ज्याचे व्यवस्थापन ह्रदयरोगतज्ज्ञ डॉ.सुनिल अग्रवाल आणि त्यांची टीम करतील. नव्याने विकसित करण्यात आलेल्या प्रक्रिया जसे की २डी इको, स्ट्रेस टेस्ट, अँजिओग्राफी सवलतीच्या दरात केली जाईल.

या व्यतिरिक्त पात्र रुग्णांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत अँजिओप्लास्टी, पेसमेकर इम्प्लांटेशन, इंट्रा कार्डियाक डिफिब्रिलेशन यासारख्या प्रगत ह्रदयाच्या प्रक्रिया मोफत केल्या जातील. ह्रदयविकाराच्या वाढत्या ताण तणावाच्या युगात हे नागरिकांसाठी वरदान ठरणार आहे.

स्फेरूल फाउंडेशन, कोटक महिंद्रा बँक आणि सीपीआर ग्रुप यांच्या आर्थिक सहाय्याने नवजात शिशु अतिदक्षता विभागाची स्थापना केली आहे. नवजात शिशु आयसीयू कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल आणि इतर जवळच्या हॉस्पिटलमध्ये जन्मलेल्या नवजात मुलांसाठी सवलतीच्या दरात अतिदक्षता सेवा प्रदान करेल.हे युनिट अशा नागरिकांसाठी फायदेशीर ठरेल.

ज्यांना महागडी एनआयसीयू केअर परवडत नाही आणि एनआयसीयू बेडची सतत वाढणारी मागणी पूर्ण करण्याची दीर्घकाळची मागणीही पूर्ण करेल. प्रधान मंत्री जन औषधी केन्द्र या जेनेरिक औषध केंद्रामुळे कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलच्या आवारात नागरिकांना स्वस्त जेनेरिक औषधे उपलब्ध होतील. ज्यामुळे दीर्घकालीन आजारांनी ग्रस्त असलेल्या नागरिकांचा आर्थिक भार कमी होईल. ही औषधे त्यांच्या ब्रँडेड औषधांपेक्षा जवळजवळ ८० ते ९०% स्वस्त आहेत.

लिक्विड ऑक्सीजन टाकी अतिदक्षता विभाग,नवजात शिशु अतिदक्षता विभाग, ऑपरेशन थिएटर आणि कॅथ लॅबसाठी आवश्यक ९९% शुद्ध ऑक्सीजनचा समर्पित पुरवठा सुनिश्चित करेल. कार्यक्रमादरम्यान देणगीदार उदा.ए.के.अब्दुजी ट्रस्ट आणि कोटक महिंद्रा बँक, स्फेरुयल फाउंडेशन आणि सीपीआर ग्रुपच्या प्रतिनिधींचा गरीब रुग्णांच्या हितासाठी केलेल्या उदार कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.

कमानीवर पटेल यांचे नाव वगळले..

कमानीवर सरदार वल्लभभाई पटेल नाव वगळल्याने नागरिकांनी असंतोष व्यक्त केला आहे. यावेळी बोर्डाचे उपाध्यक्ष सचिन मथुरावाला यांनी कमानीवर नाव टाकण्यासाठी बोर्डाकडे मागणी केली आहे. यावेळी सीईओ पाल म्हणाले की, कमानीवर जागा नसल्याने छोट्या अक्षरात त्यांचे नाव देणे हे बरोबर दिसत नाही. येणाऱ्या जाणाऱ्यांना नाव ठळक अक्षरात दिसण्याकरिता डाव्या भिंतीला मोठ्या अक्षरात नाव दिले गेले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com