‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत स्‍वदेशी बनावटीच्या वाहनांचा लष्करी ताफ्यात समावेश

केंद्र सरकारची महत्वकांशी संकल्पना असलेल्या ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत स्‍वदेशी बनावटीच्या वाहनांचा समावेश लष्करी ताफ्यात मंगळवारी लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
Indian Army Vehicle
Indian Army VehicleSakal
Summary

केंद्र सरकारची महत्वकांशी संकल्पना असलेल्या ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत स्‍वदेशी बनावटीच्या वाहनांचा समावेश लष्करी ताफ्यात मंगळवारी लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

पुणे - केंद्र सरकारची (Central Government) महत्वकांशी संकल्पना असलेल्या ‘आत्मनिर्भर भारत’ (Aatmanirbhar Bharat) अंतर्गत स्‍वदेशी बनावटीच्या वाहनांचा (Indian Vehicle) समावेश लष्करी (Army) ताफ्यात मंगळवारी लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे (M.M. Narawane) यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. येथील बॉम्बे इंजिनिअर ग्रुप (बीईजी) येथे आयोजित कार्यक्रमादरम्यान या सर्व वाहनांना सुपूर्द करण्यात आले तसेच या वाहनांची पाहणी जनरल नरवणे यांनी केली. त्यामुळे हा महत्त्वपूर्ण टप्पा यशस्वीपणे पूर्ण केल्याने आत्मनिर्भर संरक्षण क्षेत्राकडे आणखीन एक पाऊल पडले आहे.

या प्रसंगी लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल मनोज पांडे, टाटा ऍडव्हान्स्ड सिस्टिम्स लि. चे (टीएएसएल) व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी सुकरन सिंह तसेच इतर अधिकारी व मान्यवर उपस्थित होते. स्वदेशी उपकरणांमध्ये इनफन्ट्री प्रोटेक्टेड मोबिलिटी वेहिकल्स (आयपीएमव्हीएस), क्विक रिॲक्शन फायटिंग व्हेईकल मीडियम (क्यूआरएफव्ही), मोनोकोक हल मल्टी रोल माईन प्रोटेक्टेड आर्मर्ड व्हेईकल आणि अल्ट्रा लॉंग रेंज ऑब्झर्व्हेशनचा समावेश आहे. यातील आयपीएमव्ही आणि अल्ट्रा लॉंग रेंज ऑब्झर्व्हेशनचा पहिला संच टीएएसएलने तर, भारत फोर्जद्वारे मोनोकोक हल मल्टी रोल माईन प्रोटेक्टेड आर्मर्ड व्हेईकल विकसित करण्यात आले आहे.

सैन्यदलाकडून या लढाऊ वाहनांची वाळवंटी तसेच उंचावरील भागांमध्ये चाचण्या घेण्यात आल्या आहेत. ही वाहने ज्या लष्करी ताफ्यांमध्ये तैनात असतील तेथे या वाहनांच्या देखरेसाठी टीएएसएल साहाय्य करणार आहे. टीएएसएल आणि भारत फोर्जद्वारे या स्वदेशी विकसित प्रणालींचा समावेश केल्यास भविष्यात भारतीय सैन्याच्या ऑपरेशनल क्षमतांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. सध्या वाहनांचे १२ युनिट लष्कराला देण्यात आले आहे. भविष्यातील मागणीनुसार वाहनांच्या उत्पादने केली जाणार आहेत.

जनरल नरवणे हे लेफ्टनंट जनरल पांडे यांच्यासमवेत दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत.

‘आयपीएमव्ही यशस्वीपणे पोचती करणे हा टीएएसएलसाठी आणि भारतीय संरक्षण उत्पादन क्षेत्रासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे कारण इथूनच डीआरडीओ आणि एका खासगी कंपनीने सह-विकसित केलेल्या एका धोरणात्मक प्लॅटफॉर्मची पहिली व्यापारी विक्री सुरु झाली आहे. कोरोनामुळे उत्पन्न झालेली आव्हाने आणि त्यामुळे झालेले विलंब या सर्वांवर यशस्वी मात करत टीएएसएलने हा टप्पा पार केला आहे त्यामुळे यश आमच्यासाठी अजून जास्त मोलाचे व लक्षणीय ठरले आहे.’

- सुकरन सिंह, संचालक - टीएएसएल

आयपीएमव्ही बाबत -

- आयपीएमव्ही टीएएसएलच्या पुण्यातील कारखान्यात विकसित व तयार करण्यात आली आहेत

- टीएएसएल आणि डीआरडीओच्या वाहन संशोधन आणि विकास संस्थेने (व्हीआरडीई) व्हील्ड आर्मर्ड प्लॅटफॉर्मवर (डब्ल्यूएचएपी) देशातच डिझाईन व विकसित केले

- या वाहनामध्ये डिफेन्स मेटॅलर्जिकल रिसर्च लॅबॉरेटरीने विकसित केलेले ‘एक्स्टर्नल ऍड-ऑन आर्मर प्रोटेक्शन पॅनेल्स’ व थर्मल साईट्ससह रिमोट कंट्रोल्ड वेपन स्टेशनचा देखील समावेश आहे

- हे वाहन मानवरहित पद्धतीने देखील चालविणे शक्य

- यामध्ये रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र, अभियांत्रिकी रेकीसाठी, पायदळ लढाऊ असा विविध स्वरूपात हे वाहन उपलब्ध आहे

- वाहनाच्या देखभाल करणे सोपे व त्यासाठीचा खर्च देखील कमी

मोनोकोक हल मल्टी रोल माइन प्रोटेक्टेड आर्मर्ड व्हेईकल बाबत -

- जगातील सर्वोच्च ५० किलो टीएनटी साइड ब्लास्ट संरक्षण प्रणाली

- कठीण प्रसंगी जलद वाहनात प्रवेश करणे किंवा बाहेर पडण्यासाठी हायड्रॉलिक रॅम्प दरवाजा

- रिमोट कंट्रोल्ड वेपन स्टेशन (आरसीडब्ल्यूएस) आणि क्षेपणास्त्र लाँचर सिस्टम (एमएलएस) सारख्या प्रगत शस्त्रास्त्रांनी सुसज्ज

- सीटीआयएस, एएफडीएसएस, वाहनांसाठी विशिष्ट प्रकारची चाके, पाहणीसाठी आधुनिक कॅमेरे, एक्झॉस्ट ब्रेक्सचा ही समावेश

- यामध्ये युद्धक्षेत्र व्यवस्थापन प्रणाली, वाहनांचे ठिकाण व ट्रॅकिंग प्रणाली देखील आहे

क्यूआरएफव्ही बाबत -

- विविध प्रकारच्या भूप्रदेशात उत्कृष्टपणे कार्य करण्याची क्षमता

- संरक्षण, आरओपी आणि एपीसी सारख्या विविध भूमिकांसाठी एक आदर्श वाहन

- सैन्याच्या सुरक्षेच्या अनुषंगाने वाहनामध्ये चार पॉइंट हार्नेस सीट बेल्ट

- तीन दरवाजे व हॅचची सुविधा, यामुळे प्रवेश आणि बाहेर पडणे सोपे

- स्फोटकांपासून संरक्षणासाठी ‘व्ही’ आकाराचा मोनोकोक हल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com