
मुंबई : विधानसभा निवडणुकीवेळी दाखल केलेल्या शपथपत्र प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात पुण्यातील सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी पुरावे सादर करण्याचे आदेश कोर्टानं तक्रारदाराला दिले आहेत. (Inconsistencies in CM Eknath Shinde election affidavit Pune Court order to submit evidences)
एकनाथ शिंदे यांनी सन २००९, २०१४, २०१९ या विधानसभा निवडणुकीत कोपरी मतदारसंघातून निवडणूक लढवली. पण यावेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात विसंगती असल्याचा दावा अभीजित खेडकर आणि डॉ. अभिषेक हरिदास या पुण्यातील दोन याचिकाकर्त्यांनी केला आहे. अॅड. समीर शेख यांच्यामाध्यमातून त्यांनी पुण्यातील कोर्टात ही याचिका दाखल केली आहे.
एकनाथ शिंदे यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात शिक्षण, शेती, मालमत्ता विविध वाहनांच्या किंमती यांबाबत ज्या नोंदी केल्या आहेत, त्यांच्यामध्ये प्रत्यक्षात विसंगती असल्याचं या याचिकेत म्हटलं आहे. सन २०१९ मध्ये शिंदे यांनी शेअर्समध्येही गुंतवणूक केली होती. त्याचा तपशीलही प्रतिज्ञापत्रातून त्यांनी वगळला असल्याचा दावा याचिकाकर्त्यानं केला आहे.
दरम्यान, याचिकेतून आरोप करणाऱ्या याचिकाकर्त्यांना कोर्टानं याबाबत पुरावे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.