हरभरा खरेदी मुदत वाढवा

हरभरा खरेदी मुदत वाढवा
Published on

हरभरा खरेदीची मर्यादा
वाढवून उर्वरित माल खरेदी करा

खासदार अमर काळे यांची प्रशासनाकडे मागणी

ॲग्रोवन वृत्तसेवा
वर्धा : ‘नाफेड’मार्फत सुरू असलेल्या हरभरा खरेदी प्रक्रियेला मुदतवाढ मिळूनही खरेदीची मर्यादा संपल्याने अनेक शेतकरी अद्याप हमीभावाने हरभरा विक्रीपासून वंचित राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार अमर काळे यांनी उर्वरित हरभरा खरेदी करण्यासाठी नाफेडची खरेदी मर्यादा वाढविण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
शेतकऱ्यांकडून हमीभावाने हरभरा खरेदी करण्यासाठी ‘नाफेड’मार्फत सुरुवातीला ७.६१ लाख टन खरेदीला मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर खरेदीची मुदत संपल्याने खासदार अमर काळे यांनी केंद्र शासन व प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्यानंतर हरभरा खरेदीस शुक्रवार (ता. २९) मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. तसेच ५८ हजार ६३२ टन अतिरिक्त खरेदीस मान्यता देत एकूण खरेदी मर्यादा ८.२० लाख टनांपर्यंत वाढविण्यात आली.
मुदतवाढीनंतर अनेक शेतकऱ्यांनी आपला हरभरा खरेदी केंद्रांवर आणला. काही शेतकऱ्यांचा माल खरेदीही करण्यात आला. मात्र अवघ्या दोन-तीन दिवसांत वाढीव खरेदी मर्यादाही पूर्ण झाल्याने ‘नाफेड’ने पुन्हा खरेदी बंद केली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा हरभरा केंद्रावर पडून असून त्यांच्यासमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. एकट्या आष्टी तालुक्यातील सुमारे १५० शेतकऱ्यांचा हरभरा खरेदीअभावी शिल्लक असल्याची माहिती पुढे आली आहे. शेतकऱ्यांनी या बाबत खासदार काळे यांच्याकडे निवेदन देत कैफियत मांडली. त्यानंतर काळे यांनी जिल्हा प्रशासन व उपनिबंधक यांना पत्र पाठवून उर्वरित हरभरा खरेदीसाठी तातडीने खरेदी मर्यादा वाढवावी आणि शेतकऱ्यांचा माल खरेदी करावा, अशी मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासन सकारात्मक निर्णय घेईल आणि उर्वरित शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा खासदार काळे यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com