रुग्णांची संख्या वाढतेय, बेड्‌सही वाढविण्याचे नियोजन; सौरभ राव यांची माहिती

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 8 September 2020

पुण्यासह जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. आरोग्य विभागाकडून पुणे जिल्ह्यात येत्या 21 सप्टेंबरपर्यंत वाढणाऱ्या बाधित रुग्णांच्या संख्येनुसार बेड्‌सची सुविधा वाढविण्याच्या दृष्टीने सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे, अशी माहिती विभागीय आयुक्‍त सौरभ राव यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

पुणे - पुण्यासह जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. आरोग्य विभागाकडून पुणे जिल्ह्यात येत्या 21 सप्टेंबरपर्यंत वाढणाऱ्या बाधित रुग्णांच्या संख्येनुसार बेड्‌सची सुविधा वाढविण्याच्या दृष्टीने सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे, अशी माहिती विभागीय आयुक्‍त सौरभ राव यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राव म्हणाले, पुणे शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले 30 टक्‍के कोरोना बाधित रुग्ण इतर जिल्ह्यांतील आहेत, ही चिंतेची बाब आहे. पुणे विभागातील कोल्हापूर, सातारा, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यातही बेड्‌स वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागातही रुग्ण संख्या वाढत आहे. बाधित रुग्णवाढीचा दर हा 24 ते 28 टक्‍क्‍यांवर गेला आहे. पुणे महापालिकेच्या क्षेत्रात मृत्यूदर 2.30 टक्‍के तर, जिल्ह्यात 2.39 टक्‍के इतका आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनातून बरे झालेल्या व्यक्‍तींकडून प्लाझमा दान करण्यासाठी तेवढा प्रतिसाद मिळत नाही. रुग्णालयात जाऊन रक्‍ताचा नमुना देणे किंवा इतर कारणे त्यामागे आहेत. परंतु उपचार करतानाच अशा रुग्णांना प्लाझमा दान करण्याबाबत आवाहन करण्यात येईल. प्लाझमाची एक हजार 595 युनिट्‌स उपलब्ध झाली होती. त्यापैकी एक हजार 334 प्लाझमा युनिटचा वापर करण्यात आला आहे. सध्या केवळ अडीचशे प्लाझमा युनिट उपलब्ध आहेत. खासगी रुग्णालयांकडून साडेचारशे बिलांची तपासणी करण्यात आली. त्यामुळे नागरिकांचे सुमारे सव्वा कोटी रुपयांची बचत झाली आहे. बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्‍तींचा आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सर्वेक्षणामध्ये सात हजार 470 रुग्ण शोधण्यात आले. त्यापैकी एक हजार 724 रुग्ण बाधित असल्याचे आढळून आल्याचे राव यांनी सांगितले. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: increase number of beds for corona patients in pune says saurabh rao