मुळशी तालुक्यात कोरोनाचा धुमाकूळ सुरूच 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 3 August 2020

मुळशी तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या आता ६६० झाली आहे. तालुक्यातील मोठ्या गावातून कोरोना आटोक्यात येत नाही. मात्र, रूग्ण बरे होण्याचे प्रमाण पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आहे, हे दिलासा दायक आहे. 

पुणे : मुळशी तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या आता ६६० झाली आहे. तालुक्यातील मोठ्या गावातून कोरोना आटोक्यात येत नाही. मात्र, रूग्ण बरे होण्याचे प्रमाण पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आहे, हे दिलासा दायक आहे. 

पिरंगुट : मुळशी तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. आज तालुक्यात नवीन १६ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या आता ६६० झाली आहे. 

मुळशी तालुक्यात आज पिरंगुट व म्हाळुंगे येथे प्रत्येकी ४, कासार आंबोली व माण येथे प्रत्येकी २ तर दारवली, बावधन, कासारसाई व नेरे येथे प्रत्येकी १ रुग्ण रुग्ण सापडला आहे. आज बरे होऊन घरी सोडलेल्यांमध्ये १६ रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे तालुक्यात बरे होऊन घरी सोडलेल्या रुग्णांची संख्या आता ३९७ झाली आहे. आज कोरोनामुळे एकही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. त्यामुळे आज अखेर तालुक्यातील मृतांची संख्या २० आहे. सध्या रुग्णालयात २४३ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी अत्यवस्थ स्थितीत १ असून, अतिदक्षता विभागात ४ रुग्ण उपचार घेत आहेत.  

भुकूम : मुळशी तालुक्यातील मोठ्या गावातून कोरोना आटोक्यात येत नाही. मात्र, रूग्ण बरे होण्याचे प्रमाण पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आहे, हे दिलासा दायक आहे. 

मुळशी तालुक्यातील बावधन, भूगाव, पिरंगुट, कासारअंबोली, म्हाळुंगे, माण, नेरे, मारूंजी, उरवडे, भुकूम गावातून करोना रूग्ण सापडण्याचे प्रमाण जास्त आहे. तालुक्यातील पुणे शहरात व एकजण पिंपरी चिंचवड शहरात राहणारे करोनामुळे दगावले आहेत. तालुक्यातील रूग्ण सापडलेले घोटावडे, लवळे, भरे, अंबडवेट, हिंजवडी, आंदगाव या गावांनी कारवाई करून रुग्णांची संख्या वाढवून दिली नाही. मोठी गावे शहराजवळ आहेत. लोकवस्ती मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अनेक व्यावसाय, कंपन्या गावातून आहे. एकमेकांशी संपर्क नेहमी होत आहे. शहरात नोकरी, व्यावसायानिमित्त दररोजचा संपर्क होत आहे. त्यामुळे अशा गावातून कोरोना रूग्ण नेहमी सापडत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increase in the number of corona patients in Mulshi taluka