esakal | उरुळी कांचन, लोणी काळभोर, पुरंदरमध्ये कोरोनाचा उद्रेक
sakal

बोलून बातमी शोधा

Corona l.jpg

उरुळी कांचन, लोणी काळभोर, सोरतापवाडीसह पूर्व हवेलीत गेल्या पाच दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक झाला आहे.

उरुळी कांचन, लोणी काळभोर, पुरंदरमध्ये कोरोनाचा उद्रेक

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

लोणी काळभोर (पुणे) : उरुळी कांचन, लोणी काळभोर, सोरतापवाडीसह पूर्व हवेलीत गेल्या पाच दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक झाला आहे. लोणी येथील कोविड केअर सेंटरमधून सोमवारी सकाळी चाचणीसाठी पाठवलेल्या 137 पैकी 59 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पूर्व हवेलीत गेल्या पाच दिवसांत दोनशेहून अधिक रुग्ण आढळले. त्यात आज लोणी काळभोर येथील कोविड केअर सेंटरमधील 59 रुग्णांची भर पडली. यात लोणी काळभोरमधील 12, कदमवाकवस्तीतील 7, उरुळी कांचन 7, सोरतापवाडी 6, थेऊर 4, नायगाव 4, आळंदी म्हातोबाची 1 व मांजरी बुद्रुकमधील 14 रुग्ण असल्याचे सेंटरचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. डी. जे. जाधव यांनी दिली. 

पुरंदरमध्ये 36 रुग्णांची भर

सासवड : पुरंदर तालुक्यात आज दिवसभरात तब्बल 36 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. त्यातील 25 रुग्ण एकट्या सासवड शहरातील असल्याने नागरिकांची झोप उडाली आहे. आजच्या रुग्णासह तालुक्यातील रुग्णांचा आकडा 893 वर आणि सासवड शहर 379 वर पोचले. केवळ आठवड्यात पुरंदर तालुक्यात तब्बल 146 रुग्ण वाढले.

पुण्यात फिल्मीस्टाईल थरार; खूनाचा प्रयत्न करणाऱ्याचा पोलिसांनी केला पाठलाग आणि...

काळेवाडी चार, लपतळवाडी दोन रुग्ण पाॅझिटिव्ह आढळून आले. तर जेजुरी, राख, दिवे, सोनोरी, एखतपूर या गावात प्रत्येकी एक - एक रुग्ण पाॅझिटिव्ह आढळून आला. केवळ आठवड्यात पुरंदर तालुक्यात तब्बल 146 रुग्ण वाढले. तर तीन बळी वाढत एकूण मृत्यूचा आकडा 33 पर्यंत पोचला आहे. 

loading image
go to top