esakal | पुणे जिल्ह्याच्या वार्षिक विकास आराखड्यात तब्बल एवढ्या कोटींची वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

Pune ZP

पुणे जिल्ह्याच्या वार्षिक विकास आराखड्यात तब्बल एवढ्या कोटींची वाढ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे जिल्ह्याच्या (Pune District) वार्षिक विकास आराखड्यात (Development Plan) गतवर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे १७० कोटी रुपयांची वाढ (Increase) झाली आहे. चालू आर्थिक वर्षासाठी मार्च २०२० मध्ये तयार केलेला ६९५ कोटी रुपयांचा वार्षिक आराखडा पुढेही कायम ठेवण्यात आला आहे. या ६९५ कोटी रुपयांचा नवीन प्रारूप आराखड्याला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शुक्रवारी (ता.१६) मंजुरी देण्यात आली. दरम्यान, जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हा परिषदेच्या विविध विभागांना विकासकामांसाठी प्राप्त होणाऱ्या निधीत कोरोनामुळे ३० टक्के कपात केली जाणार आहे. (Increase of Crores Annual Development Plan of Pune District)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. या बैठकीत गेल्या आर्थिक वर्षात (२०२०-२१) विकासकामांवर झालेल्या खर्चास आणि चालू आर्थिक वर्षाच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी देण्यात आली. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, खासदार गिरीश बापट, सुप्रिया सुळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पुणे पालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड पालिका आयुक्त राजेश पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा नियोजन अधिकारी संजय मरकळे आदींसह शहर व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी होते.

हेही वाचा: सार्वजनिक वाहतूक व्यवस्था महिलांसाठी सक्षम करणार; यशोमती ठाकूर

मागील आर्थिक वर्षात (२०२०-२१) जिल्ह्याचा ५२३ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला होता. मात्र कोरोनाचा प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी यापैकी ३० टक्के निधी राखीव ठेवण्यात आला होता. परिणामी ऐनवेळी या आराखड्यातील निधीच्या रकमेत ३० टक्क्यांनी कपात करावी लागली होती. परंतु आर्थिक वर्षाच्या शेवटी शिल्लक निधी हा वार्षिक योजनेंतर्गत केल्या जाणाऱ्या विकासकामांसाठी राज्य सरकारने उपलब्ध करून दिला होता. गेल्या आर्थिक वर्षाचा पुणे जिल्ह्याचा मूळ विकास आराखडा हा ५२३ कोटी रुपयांचा होता. परंतु वर्षाच्या सरते शेवटी मिळालेल्या निधीमुळे तो ६८५ रुपयांचा झाला होता. गतवर्षीच्या मूळ आराखड्याच्या तुलनेत यंदा सुमारे पावणे दोनशे कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

आराखड्यातील प्रस्तावित तरतूद (रुपयांत)

- सर्वसाधारण योजना ---- ५२१ कोटी ६९ लाख रुपये

- अनुसूचित जाती उपयोजना --- १२८ कोटी ९३ लाख

- अनुसूचित जमाती उपयोजना --- ४४ कोटी ३८ लाख

- एकूण वार्षिक आराखडा --- ६९५ कोटी

loading image