esakal | ग्रामीण रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन बेड वाढवा

बोलून बातमी शोधा

oxygen beds in rural hospitals Demand of ZP President to District Collector

गरजू कोरोना रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन सहज उपलब्ध व्हावे, या उद्देशाने जिल्हास्तरावर सुरु करण्यात आलेल्या जिल्हा नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक लागत नाहीत आणि एखाद्यावेळी हा क्रमांक चुकून लागला तरी, गरजू रेमडेसिविर उपलब्ध होत नाही, असा आरोपही अध्यक्षा पानसरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात केला आहे

ग्रामीण रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन बेड वाढवा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : जिल्ह्यातील सर्व उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन बेडची संख्या वाढवा आणि या रुग्णालयांत उपचारासाठी दाखल होणाऱ्या कोरोना रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून या इंजेक्शनचे डोस खरेदी करण्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी पुणे जिल्हा परिषदेला उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे केली आहे.

कोरोना रुग्णांची बेडसाठी वणवण!  पंचतारांकित रुग्णालयात बेड नाहीत 

गरजू कोरोना रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन सहज उपलब्ध व्हावे, या उद्देशाने जिल्हास्तरावर सुरु करण्यात आलेल्या जिल्हा नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक लागत नाहीत आणि एखाद्यावेळी हा क्रमांक चुकून लागला तरी, गरजू रेमडेसिविर उपलब्ध होत नाही, असा आरोपही अध्यक्षा पानसरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात केला आहे. सोमवारी (ता.१२) अध्यक्षा पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतरे आणि आरोग्य समितीचे सभापती प्रमोद काकडे यांनी संयुक्तपणे जिल्हाधिकाऱ्यांना हे पत्र पाठविले आहे.

कौतुकास्पद! महाराष्ट्रात सर्वप्रथम 1 कोटी लसीकरणाचा टप्पा पार

पुणे शहराच्या धर्तीवर ग्रामीण भागातील खासगी रुग्णालयेसुद्धा कोरोना रुग्णांसाठी ताब्यात घ्यावेत, ग्रामीण रुग्णालयांबरोबरच खासगी रुग्णालयांमध्येही रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा उपलब्ध करून द्यावा, सर्व उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांमध्ये आॅक्सीजन बेडची संख्या वाढवावी आणि रेमडेसिविर इंजेक्शनसाठी जिल्हा परिषदेला पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, आदी मागण्या अध्यक्षा पानसरे यांनी या पत्राद्वारे केल्या आहेत.