विद्यार्थी-चाकरमान्यांसाठी पीएमपी बस फेऱ्या वाढवा

काळेबोराटेनगर : कोरोनामध्ये बंद केलेली अटल बससेवा सुरू करा
PMP Bus
PMP BusSakal

उंड्री - कोरोना महामारीनंतर शाळा-महाविद्यालये, उद्योग व्यवसायही सुरू झाले आहेत. मात्र, बसेसची संख्या कमी असल्याने प्रवासासाठी महागड्या रिक्षाने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने बसेसची संख्या वाढवून येथील विद्यार्थी आणि नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी विद्यार्थी-पालकांनी केली आहे.

संकेत विहार ते हडपसरला जाण्यासाठी येथे जाण्यासाठी रिक्षाचालक मनमानी पद्धतीने भाडे आकारत आहे. बसेसची संख्या कमी असल्याने नाईलाजाने रिक्षाने महागडा प्रवास करावा लागतो. वाढत्या महागईमुळे आर्थिक गणितच कोलमडले आहे. डॉक्टरांच्या शुल्कापेक्षा जादा पैसे रिक्षावाल्यांना द्यावे लागतात, असे निवृत्त प्रा. धर्मराज म्हेत्रे यांनी दै. सकाळशी बोलताना सांगितले.

शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यासाणी शाळेतून गैरसोय होत आहे. पाच रुपयांत अटल बससेवा होती, ती कोरोना महामारीनंतर बंद केलेली अटल बससेवापुन्हा सुरू करावी.

- मंगल तोडकर, संकेत विहार.

संकेत विहार परिसरात बसेसची संख्या कमी असल्याने रिक्षाचालक अडवून पैसे जादा घेतात. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि रुग्णांची गैरसोय होत आहे. बस वेळेत नसते आणि बसपेक्षा प्रवासी जास्त असल्याने पायपीट करावी लागते.

- सोपान घोगरे, काळेबोराटेनगर.

संकेत विहारपर्यंत रात्री ९ वाजेपर्यंत सुरू आहेत. प्रवाशाच्या तुलनेत बसेस कमी असल्याने महिला-मुलींची कुचंबना होता आहे. पीएमपी बसथांब्यावर शेड उभारून स्ट्रीटलाईटची व्यवस्था करावी.

- प्रा. शोभा लगड, काळे-बोराटेनगर.

पीएमपी बस नागरिकांच्या सोयीसाठी असून, बसेस वेळेत धावतात. मात्र पावसामुळे रस्ते खराब झाल्याने बसेस वेळेवर पोहोचत नाहीत. ७ मीटरच्या बसेस लवकरच पीएमपीच्या ताफ्यात आल्यानंतर बसफेऱ्या वाढवल्या जातील.

- समीर अत्तार, व्यवस्थापक, हडपसर आगार.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com