esakal | सौद्यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होण्याच्या प्रकारात वाढ

बोलून बातमी शोधा

Farmer

फसवणुकीचे असेही प्रकार  
शेतकऱ्यांच्या बांधावरून वजनकाटा न करता नं.१ शेतमालाची खरेदी पडत्या भावाने खरेदी केली जात आहे. नं.२ मालाची खरेदीकडे व्यापारी चक्क पाठ फिरवत आहेत. त्यामुळे, शेतकऱ्याला माल नाममात्र किमतीत इतर व्यापाऱ्यांना विकावा लागतो. खासगी ठिकाणच्या वजन काट्यावर देखील शेतमालाच्या वजनात घट दाखविली जाते. हे व्यवहार कागदावर दिसत नसल्याने व्यापाऱ्यांकडे काळ्या पैशाची निर्मितीदेखील होत आहे.

उपाय काय ?

  • व्यापाऱ्यांना बाजार समितीचे परवाने घेणे बंधनकारक करावे
  • खरेदीसाठी व्यापाऱ्यांना ओळखपत्रे देणे, जागेवरच हिशेबपट्टी करण्याचा नियम हवा
  • समितीच्या ऑनलाइन बाजारभावाबद्दल जागरूक राहणे
सौद्यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होण्याच्या प्रकारात वाढ
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी - शेतीमालाचे बाजार आवाराबाहेरील नियमन रद्द केल्याचा गैरफायदा व्यापाऱ्यांकडून घेतला जात असून शेतकऱ्यांची फसवणूक होण्याचे प्रकार वाढत आहेत. वजनकाटा न करता शेतकऱ्यांकडून उक्‍त पद्धतीने पडत्या किमतीत शेतमाल खरेदी केली जात आहे. बाजाराच्या आवाराबाहेरील व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार उरले नसल्याने त्यावर कारवाई करणेही कृषी उत्पन्न बाजार समितीला अशक्‍य झाले आहे.

ताज्या बातम्यांसाठी करा ई-सकाळचे ऍप 

कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणेच्या पिंपरी उपबाजारामध्ये हवेली तालुक्‍यातील कोलवडी गावचे शेतकरी सत्यवान जोरे यांच्याबाबत अशी फसवणूक झाल्याचा प्रकार उजेडात आला आहे. बाजार आवाराबाहेरील व्यवहार नियमनमुक्त झाले आहेत. बाजार आवारातील लिलाव, सौदा नोंद किंवा हिशोबपट्टी तयार करण्याची पद्धत तेथे लागू होत नाही. त्याचाच गैरफायदा घेत पिंपरी कॅम्प येथील भाजी मंडईतील व्यापाऱ्याने त्यांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.      

जोरे म्हणाले, ‘‘काही दिवसांपूर्वी पिंपरी उपबाजारातील एका व्यापाऱ्याने माझ्या शेतावर येऊन अडीच लाख रुपयांचा फ्लॉवरचा माल खरेदी केला; परंतु, कोणत्याही प्रकारची हिशेबपट्टी नसल्याने व्यापारी १८ महिन्यांपासून पूर्ण पैसे देण्यास टाळाटाळ करत आहे. त्याच्याकडे सध्या ४७ हजार रुपये शिल्लक राहिले आहेत. माझ्यासह आणखी काही शेतकऱ्यांचे पैसे त्याच्याकडे थकीत आहेत. त्याबाबत मी बाजार समितीकडे तक्रार दिली आहे.’’

शेतातील बांधावरच्या शेतमाल खरेदीमध्ये फसवणूक झाल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त होत आहेत; परंतु, आम्हाला केवळ बाजार आवारातील तक्रारींवर कारवाई करता येते; परंतु, बाजार आवाराबाहेरील क्षेत्र नियमन मुक्त झाल्याने तेथे बाजार समितीला  कारवाई करण्याचे अधिकार नाहीत.
- राजू शिंदे, प्रमुख, पिंपरी उपबाजार, कृषी उत्पन्न बाजार समिती