esakal | आखाडची जोरदारी तयारी; चिकन, मटणाच्या मागणीमध्ये वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

आखाडची जोरदारी तयारी; चिकन, मटणाच्या मागणीमध्ये वाढ

आखाडची जोरदारी तयारी; चिकन, मटणाच्या मागणीमध्ये वाढ

sakal_logo
By
प्रविण डोके

मार्केट यार्ड : गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी खोल समुद्रातील मासळीची सुमारे १५ टन, खाडीच्या मासळीची २०० किलो, नदीच्या मासळीची सुमारे २ टन आवक झाली. तर आंध्रप्रदेशातून रहू, कतला आणि सिलनची सुमारे १५ टन आवक झाली. दरम्यान मासेमारी बंद असल्याने खाडीच्या मासळीमध्ये सौंदाळे, खापी, लेपा, पालू, पेडवी, तारी बेळुंजी याची आवक झाली नाही. दरम्यान, आषाढ महिन्यामुळे चिकन व मटणला मागणी वाढली आहे.

हेही वाचा: लसीकरणाने गाठला ६० लाखांचा आकडा

खोल समुद्रातील मासळीच्या प्रतिकिलोचे भाव (रुपयांत) : पापलेट : कापरी : १५००-१६००, मोठे १४००-१५००, मध्यम : १०००-१२००, लहान ९००-१०००, भिला : ७००, हलवा : ७००-९००, सुरमई : ६००-१०००, रावस : लहान ७००-९००, मोठा : १२००, घोळ : ९००, करली : ४००, पाला : १०००-१२००, वाम : पिवळी ८००, काळी ४००.

कोळंबी : लहान २८०, मोठी ४००-५५०, जंबोप्रॉन्स : १००० किंगप्रॉन्स : ७००, लॉबस्टर : १०००, मोरी : २४०-३६०, खेकडे २४०, चिंबोऱ्या ५५०.

खाडीची मासळी : नगली ५५०-६००, तांबोशी ४४०, बांगडा ३२० - ३६०, शेवटे १२०, तिसऱ्या २४०, खुबे १४०

नदीची मासळी : रहू : १००- १६०, कतला : १२०-१६०, मरळ : ४००-४८०, शिवडा : १६०, खवली : २५०, आम्ळी : १५०, खेकडे : २००, वाम : ५२०.

चिकन प्रतिकिलोचे भाव (रुपयांत) : चिकन : २४०, लेगपीस : २८०, जिवंत कोंबडी : १९०, बोनलेस : ३४०.

मटण : बोकडाचे : ७००, बोल्हाईचे : ७००, खिमा : ७००, कलेजी : ७४०.

हेही वाचा: कोव्हीशील्डचे लसीकरण आज बंद

अंड्यांच्या भावात घट

चिकनला मागणी वाढल्याने अंड्याच्या मागणीत घट झाली. इंग्लिश आणि गावरान अंड्यांच्या भावात शेकड्यामागे ३० ते ४० रुपयांची घट झाली.

अंड्यांचे भाव : गावरान : शेकडा : ८८०, डझन : १२०, प्रति नग : १०. इंग्लिश : शेकडा : ४७०, डझन : ६६, प्रतिनग : ५.५०.

फोटो : E21R91243

loading image
go to top