Illegal Advertisement
sakal
पुणे - शहरातील अनधिकृत होर्डिंग, फ्लेक्सवर महापालिका दंडात्मक कारवाई करते. पण हा दंड कमी असल्याने शुल्क बुडवून चमकोगिरी करणारे राजकीय नेते, संस्था, होर्डिंग व्यावसायिकांना आर्थिक भूर्दंडाचा त्रास होत नव्हता. पण आता महापालिकेने वाढवलेल्या दंडामुळे अनधिकृत जाहिराती करणारे, होर्डिंग उभारणाऱ्यांचे कंबरडे मोडणार आहे. अनधिकृत होर्डिंगसाठी पूर्वी ५० हजार रुपये दंड होता, आता तो थेट २ लाख रुपये केला आहे, तर अनधिकृत बोर्ड, बॅनर आणि फ्लेक्स लावणाऱ्यांना प्रति दिन एक हजार रुपयांऐवजी दोन हजार रुपये दंड घेतला जाणार आहे.