पुणे : महिला, बालकांच्या आरोग्याकडे ‘लक्ष’ वाढले

निधी लाभार्थ्यांना मिळण्याचे प्रमाण ८६ टक्क्यांवर; राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाची अंमलबजावणी
nuhm
nuhmsakal
Updated on

पुणे : ‘राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियाना’अंतर्गत (NUHM) महापालिकेला (pune corporation) दरवर्षी कोट्यावधी रुपयांचा निधी मिळत होता, पण अंमलबजावणीतील योजनेतील त्रुटी, पाठपुराव्यात सातत्य नसणे यामुळे निधी खर्ची पडत नव्हता. मात्र, गेल्या दोन वर्षापासून महापालिकेने योजनेची अंमलबजावणी तळापर्यंत घेऊन जात असल्याने गरोदर महिला, बालके यांच्यासह क्षयरोगाच्या रुग्णांना दिलासा मिळत आहे. पाच योजनांमध्ये गेल्या दोन वर्षात ७४ हजार २२९ लाभार्थ्यांना १८ कोटी ३० लाख ८२ हजार १६८ रुपयांचा लाभ मिळाला आहे. (Increased focus on womens and childrens health)

केंद्र सरकारतर्फे ‘एनयूचएम’च्या माध्यमातून गरोदर महिला, बालके, क्षयरोग (टीबी), कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया अशा योजना राबविल्या जातात. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेतर्फे दरवर्षी सुमारे २२ लाख घरांमध्ये सर्वेक्षण केले जाते. या योजनेच्या माध्यमातून गरोदर महिलांची प्रकृती चांगली राहावी, सुदृढ बाळ जन्मास यावे व त्याची देखभाल चांगली व्हावी, तसेच कुटुंब नियोजनासाठी शस्त्रक्रिया करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. आरोग्य विभागातील विभागीय वैद्यकीय अधिकारी, क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी, नर्स यांचा सहभाग असतो. सर्वेक्षण केल्यानंतर निधी उपलब्ध होते. पण योग्य पद्धतीने अंमलबजावणी होत नसल्याने निधी खर्च पडण्याचे प्रमाण ५० टक्के पेक्षा कमी होते. मात्र, आता महापालिकेकडून विशेष प्रयत्न केले जात असल्याने निधी खर्चीही पडत आहे आणि लाभार्थ्यांची संख्या देखील वाढत आहे.

nuhm
जुन्नर : विद्युत तारांमुळे लागलेल्या आगीत 8 वर्षाची चिमुकली भाजली

‘‘एनयूएचएम’ योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांना मदत मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. या कामात डॉक्टर, नर्स असे सुमारे सव्वा चारशे जण वर्षभर काम करत असतात. नागरिकांच्या घरी जाऊन चौकशी केली जाते. २०२१-२१ या वर्षात ८६ टक्के म्हणजे १४ कोटी १७ लाख रुपयांपैकी १२ कोटी २० लाख रुपयांचा लाभ नागरिकांना मिळाला आहे. पुढील वर्षासाठी आता नव्याने सर्वेक्षण सुरू झाले आहे.

- डॉ. वैशाली जाधव, सहायक आरोग्य प्रमुख

‘‘जानेवारी महिन्यात मला टीबी झाल्याचे समोर आले, त्यानंतर महापालिकेच्या दळवी दवाखान्यात उपचार सुरू झाले. या आजाराच्या गोळ्यांसाठी दर महिन्याला ५०० रुपये थेट माझ्या बँक खात्यात जमा होत होते. अधूनमधून डॉक्टर घरी येऊन तपासणी करत. आता मी पूर्ण बरी होत आली आहे."

-ताराबाई गांगुर्डे, खैरेवाडी, शिवाजीनगर

nuhm
फक्त माणुसकी! कोविड सेंटरमध्ये चिमुकल्याचा पहिला वाढदिवस साजरा

एनयूएचएमअंतर्गत योजना व लाभार्थी संख्या

योजना २०१९-२० २०२०-२१

जननी सुरक्षा योजना ६२५ १२२८

कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया ५६९ २८३१

जननी शिशू सुरक्षा रक्तसंक्रमण ७५३३ ७९३१

गरोदर महिला व बालके यांची

प्रयोगशाळेत तपासणी १५९०३ ३१९५४

टीबी रुग्णांच्या बँक खात्यात पैसे जमा ५३५३ ४२६६

खर्ची पडलेला निधी

वर्ष तरतूद खर्च (टक्केवारी)

२०१७-१८ १०.७२ कोटी ३.४७ कोटी (३२)

२०१८-१९ ९.४० कोटी ५.७४ कोटी (६१)

२०१९-२० १०.७३ कोटी ६.१० कोटी (५७)

२०२०-२१ १४.१७ कोटी १२.२० कोटी (८६)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com