esakal | वारजे माळवाडी भागात वाढतीय रुग्णसंख्या; नवे चार हजार रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

Corona In Pune

वारजे माळवाडी भागात वाढतीय रुग्णसंख्या; नवे चार हजार रुग्ण

sakal_logo
By
विनायक होगाडे

वारजे माळवाडी : महापालिकेच्या वारजे- कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत कोरोनाचे आज मंगळवार अखेर चार हजार ०४० नव्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत. वारजे कर्वेनगर परिसरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. २३ ठिकाणी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र करण्यात आले आहेत. अशी माहिती वारजे- कर्वेनगर क्षेत्रीय सहायक आयुक्त संतोष वारुळे यांनी दिली आहे.

या क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत वार्ड निहाय रुग्ण पुढीलप्रमाणे :
एरंडवणा प्रभाग क्रमांक १३ मध्ये ७८६, कर्वेनगर प्रभाग ३१ मध्ये १११५, वारजे माळवाडीमध्ये प्रभाग क्रमांक ३२मध्ये १३२०, प्रभाग ४२ मधील शिवणे गावामध्ये ६७२ प्रभाग ४२ उत्तमनगर गावामध्ये १४७ असे एकूण चार हजार ०४० रुग्ण सध्या आहेत.

कोरोना चाचणी
वारजे- कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत एसएनडीटी शाळेच्या आवारात दररोज स्वॅब (आरटी-पीसीआर)च्या १०० चाचण्या व अँटीजीनच्या ५० चाचण्या केल्या जातात. तर वारजे माळवाडी येथील कै.अरविंद बारटक्के दवाखाना दररोज अँटीजीनच्या १५० चाचण्या याठिकाणी मोफत सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

लसीकरण कोठे सुरु
तर ४५ वर्षावरील सर्व नागरिकांना कोरोणाचे लसीकरण मोफत केले जाते. यामध्ये एरंडवणा येथील कै.यशवंतराव थरकुडे रुग्णालय, कर्वेनगर येथील बिंदुमाधव ठाकरे, ई लर्निग स्कूल कर्वेनगर, महानगरपालिका शाळा मेंगडे जलतरण शेजारी, वारजे माळवाडी येथील कै.गंगुबाई धुमाळ विरंगुळा केंद्र, कै.अरविंद बारटक्के दवाखाना, ईशान्य नगरी, कै.पृथ्थक बराटे दवाखाना, शिवणे ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक शाळा उत्तमनगर, कर्वेनगर येथील सम्राट अशोक शाळा, वारजे येथील स्पोर्ट्स काँम्प्लेक्स अशा अकरा ठिकाणी सध्या लसीकरण सुरु आहे. सध्या दररोज दीड हजार नागरिकांना लसीकरण केले जात आहे. अन्य ठिकाणी केंद्र सुरु करून दररोज सुमारे दोन हजार नागरिकांना लसीकरण करण्याचं नियोजन सुरु आहे. असे हि वारुळे यांनी सांगितले आहे.