Vidhan Sabha 2019 : पिंपरी विधानसभा शिवसेनेकडेच? 'यांना' मिळाली उमेदवारी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 सप्टेंबर 2019

पिंपरी : भारतीय जनता पक्ष- शिवसेना महायुतीच्या जागावाटपातील पिंपरी विधानसभा मतदारसंघावर शहर भाजपने दावा केला होता. मात्र, रविवारी (ता. 29) घटस्थापनेच्या मुहूर्तावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विद्यमान आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार यांना 'एबी' फॉर्म दिला. त्यामुळे त्यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात असून, युती झाल्यास पिंपरी मतदारसंघ शिवसेनेकडेच राहणार असल्याचे स्पष्ट झाले. 
 

Vidhan Sabha 2019 : पिंपरी : भारतीय जनता पक्ष- शिवसेना महायुतीच्या जागावाटपातील पिंपरी विधानसभा मतदारसंघावर शहर भाजपने दावा केला होता. मात्र, रविवारी (ता. 29) घटस्थापनेच्या मुहूर्तावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विद्यमान आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार यांना 'एबी' फॉर्म दिला. त्यामुळे त्यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात असून, युती झाल्यास पिंपरी मतदारसंघ शिवसेनेकडेच राहणार असल्याचे स्पष्ट झाले. 

भाजप-शिवसेनेच्या जागावाटपात पिंपरी विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. मात्र, 2014 च्या निवडणुकीत युती न झाल्याने भाजप व शिवसेना स्वतंत्रपणे लढले. त्या वेळी भाजपने सदर जागा मित्रपक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला (आठवले गट) सोडला होता. आयत्या वेळी कॉंग्रेसमधून पक्षात आलेले चाबुकस्वार यांना शिवसेनेने उमेदवारी दिली होती. ते निवडून आले. आता पुन्हा त्यांनाच उमेदवारी दिली आहे. मात्र, गेल्या पाच-सहा महिन्यांपासून पिंपरीवर शहर भाजपने दावा केला होता. त्यासाठी इच्छुकांची संख्याही सर्वाधिक होती. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, नगरसेवक शैलेश मोरे, बाळासाहेब ओव्हाळ, खासदार अमर साबळे यांची कन्या वेणू साबळे, राजेश पिल्ले, भीमा बोबडे, तेजस्विनी कदम, दीपक रोकडे आदी इच्छुक होते. त्या आशयाचे फलकही काहींनी संपूर्ण मतदारसंघात लावले होते. मात्र, आता त्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The incumbent MLA Gautam Chabukswar has been nominated in Pimpri for Shiv Sena for Vidhan Sabha 2019