इंदापूर बस स्थानक बनले क्रिकेटचे मैदान | Indapur Bus Stand | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indapur Bus Stand
इंदापूर बस स्थानक बनले क्रिकेटचे मैदान

इंदापूर बस स्थानक बनले क्रिकेटचे मैदान

इंदापूर - एसटी कामगारांच्या संपामुळे महामंडळाची बसवाहतूक पूर्णपणे बंद पडल्यामुळे इंदापूर बसस्थानकात सध्या संपूर्णपणे शुकशुकाट आहे. त्यामुळे बसस्थानकातील दुकानदारांनी बसस्थानकात क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटल्याने इंदापूरचे बसस्थानक हे क्रिकेटचे मैदान बनले.

इंदापूर बसस्थानक हे मुंबई हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील महत्वाचे मध्यवर्ती बसस्थानक असून येथून मुंबई, पुणे, सोलापुर, लातुर ,हैद्राबाद, नांदेड, बारामती, अक्कलकोट, अकलुज, पंढरपूर येथे जाण्यासाठी शेकडो बसेस ये जा करतात. इंदापूर हे मोक्याचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने बस स्थानकातून शेकडो गाड्या जात असल्याने व्यवसाय चांगला चालत असे. मात्र संपामुळे बस स्थानकावर शुकशुकाट असून गेल्या आठ दिवसापासून एकही बस आली नाही.त्यामुळे बसस्थानकावरील दुकानदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून ते मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहे.दुकानात गिन्हाईक नसल्याने बँक, वित्तीय संस्थाचे हप्ते कसे फेडायचे या विवंचनेत दुकानदार आहेत.

हेही वाचा: Pune Crime : लाच प्रकरणात लष्करातील दोन अधिकाऱ्यांना अटक

मात्र दुकानातील कामगारांनी ताणतणाव कमी करण्यासाठी बसस्थनाकावर क्रिकेट खेळणे पसंत केले. त्यामुळे इंदापूर च्या बस स्थानकाचे रूपांतर खेळ मैदानात झाल्याचे दिसून आले. पुणे, सोलापूर, बारामती, अकलूज येथे जाण्यासाठी आज देखीलज्यादा पैसे प्रवाश्यांकडून घेतले जात असून संपामुळे प्रवाश्यांचा संयम संपला असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रवाश्यांच्या कुरबुरी वाढत असल्याचे चित्र आहे.

loading image
go to top