
इंदापूर : इंदापूर तालुक्यातील गोखळी गुरुकुल शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण साहेबराव हरणावळ (वय ३७, रा. गोखळी, ता. इंदापूर) यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न करत दरमहा एक लाख रुपयाची खंडणी मागितल्याचा व खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शिवम बाळू डोंबाळे, वैभव हरिभाऊ माळवे, संकेत अप्पा जळक या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.