इंदापुरात भरणे-पाटील चुरस रंगलीच नाही

इंदापुरात भरणे-पाटील चुरस रंगलीच नाही

Published on

वालचंदनगर, ता. ७ : इंदापूर तालुक्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप विरुद्ध झाली. दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीमुळे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये युती झाल्यामुळे निवडणुकीमध्ये चुरस पाहायला मिळाली नाही.
इंदापूर तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या आठ व पंचायत समितीच्या १६ जागेसाठी निवडणुका पार पडल्या. जिल्हा परिषदेच्या आठ जागेमुळे इंदापूरकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. जिल्हा परिषदेवरही झेंडा फडकविण्यासाठी इंदापूर तालुका महत्त्वाचा गड ठरणार आहे. यापूर्वी इंदापूर तालुक्यातील निवडणुका म्हटलं की चुरस होणारच असे चित्र प्रत्येक निवडणुकीला पाहायला मिळत होते; मात्र पहिल्यांदाच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये युती झाल्यामुळे एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या युती झाली. तालुक्यामधील दोन प्रमुख नेत्यांची युतीमुळे निवडणुकीमध्ये चुरस पाहायला मिळाली नाही. दोघांनी एकत्र प्रचार केला.भाजपने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्वच जागेवरती उमेदवार दिले होते. भाजपच्या वतीने ज्येष्ठ नेते प्रदीप गारटकर व युवा नेते प्रवीण माने यांची पक्षाची धुरा सांभाळली. तालुक्यातील वालचंदनगर-बोरी व लासुर्णे-सणसर या गटामध्ये मतदारांमध्ये उत्साह पहावयास मिळाला नाही. या गटामध्ये दुपारी साडेतीन वाजेपर्यंत सुमारे ४० टक्के मतदारांनी हक्क बजावला.तालुक्यामध्ये साडेतीन वाजेपर्यंत ४८.८३ टक्के मतदारांनी लोकशाहीचा हक्क बजावला. वालचंदनगर गणामधून कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांचे चिरंजीव श्रीराज भरणे यांनी पंचायत समितीची निवडणूक लढवली. त्यांच्या विरोधात भाजपचे सचिन धापटे निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते. काटे-लाखेवाडी गटामध्ये राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदच माजी सदस्य श्रीमंत ढोले व भाजपचे विलास वाघमोडे यांच्यामध्ये चुरशीची लढत होती. विलास वाघमोडे हे हर्षवर्धन पाटील यांचे कट्टर समर्थक आहेत. मात्र, उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी भाजपमधून निवडणूक लढवली. तसेच वडापुरी-माळवाडी गटामधून राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षातर्फे जिल्हा बॅंकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे यांचे चिरंजीव यशराज जगदाळे व भाजपकडून माजी पंचायत समितीचे सदस्य सतीश पांढरे हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते. पांढरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पंचायत समितीचे माजी सदस्य होते. बावडा-लुमेवाडी गटामध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या राष्ट्रवादीच्या अंकिता पाटील -ठाकरे व भाजपच्या अंजली घोगरे यांच्यामध्ये लढत झाली.

दादांच्या निधनामुळे प्रचारसभा नाही
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेमुळे इंदापूर तालुक्यामध्ये प्रचारसभा झाल्या नाही. दादांच्या निधनामुळे मतदारांना कमी उत्साह पाहायला मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com