
इंदापूर : नरूटवाडी येथील प्रीतेश मधूकर भरणे यांनी शेतीत अत्याधुनिक पद्धतीने सात एकरांमध्ये केळी उत्पादन घेत तब्बल ५० लाखांहून अधिक रुपये कमविले. त्यांच्या या निर्यातक्षम केळी उत्पादनाची भुरळ इराणच्या केळी व्यापाऱ्यांनाही पडली असून केळीची इराणला निर्यात होण्यास सुरुवात झाली आहे.