

इंदापूर, ता. १६ : शहरातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये ध्वजवंदन करण्यात आले. प्रशासकीय भवन येथे हा कार्यक्रम झाला. पोलिसांच्या वतीने मानवंदना देण्यात आली.
याप्रसंगी तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी महसूल विभागाचे विविध अधिकारी, कर्मचारी यांच्यासह शहरातील नागरिक उपस्थित होते. पंचायत समिती येथे सभापती हर्षवर्धन लोंढे यांनी ध्वजवंदन केले. यावेळी गटविकास अधिकारी सचिन खुडे यांच्यासह पंचायत समितीच्या सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. नगरपरिषद येथे नगराध्यक्ष भरत शहा यांचे हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी भाजप नेते प्रदीप गारटकर, विरोधी पक्षनेते अनिल पवार, मुख्याधिकारी रमेश ढगे, श्री नारायणदास रामदास हायस्कूलचे विद्यार्थी उपस्थित होते. इंदापूर पोलिस स्थानकात पोलिस निरीक्षक विलास नाळे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.