भरणेवाडीमध्ये दिव्यांग, वयोश्रींना साहित्य वाटप

भरणेवाडीमध्ये दिव्यांग, वयोश्रींना साहित्य वाटप

Published on

वालचंदनगर, ता. ५ ः भरणेवाडी (ता. इंदापूर) येथे इंदापूर तालुक्यातील ४ हजार २७९ दिव्यांग व वयोश्रींना वेगवेगळ्या प्रकारच्या २० हजारपेक्षा अधिक सहायक उपकरणांचे मोफत वाटप करण्यात आले.
येथे कृषीमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली कै. भगवानराव भरणे प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येतात. भारतीय कृत्रिम अंगनिर्माण निगमच्या विशेष सहकार्यातून सामाजिक सक्षमीकरण शिबिराच्या माध्यमातून भरणे प्रतिष्ठानने गेल्या काही महिन्यांपासून केंद्रीय सामाजिक न्याय विभागाच्या ए. डीप व आर. व्ही. वाय योजनेतून तालुक्यातील दिव्यांग व वयोश्रींची तपासणी करुन सहायक उपकरणांची मागणी केली होती. कृषीमंत्री भरणे यांनी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्याकडे योजनेबाबत पाठपुरावा करुन दिव्यांग व वयोश्रीसाठी मोफत साहित्य उपलब्ध करुन घेतले. रविवार (ता. ४) लाभार्थ्यांना भरणेवाडी येथे कृषीमंत्री भरणे यांच्या हस्ते साहित्याचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, क्षेत्रीय विपणन केंद्राचे उपप्रबंधक केशव गीते, जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, इंदापूरचे नगराध्यक्ष भरत शहा, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, नियोजन मंडळाचे माजी सदस्य सचिन सपकळ, माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले, अभिजित तांबिले, हनुमंत बंडगर, छत्रपती कारखान्याचे संचालक तानाजी शिंदे, माजी सरपंच राहुल साबळे आदी उपस्थित होते.

वाटप करण्यात आलेले साहित्य
मानेचा पट्टा (३५३), कमोड सह चेअर स्टूल (१६२९), फोल्डेबल वॉकर (१०५), गुडघ्याचा पट्टा (७०९६), कमरेचा पट्टा(३६६०), सिलिकॉनफोम उशी (११०६), पाठीचा पट्टा (१९२), टेट्रापॉड (९०४), ट्रायपॉड (५१८), चालण्याची काठी(१०७२), समायोज्य चालण्याची काठी (११०१), सीटसह चालणारी काठी(६०), व्हीलचेअर फोल्डिंग (११६६), श्रवणयंत्र(७२८) या साहित्याचे वाटप करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com