इंदापूर : ५७४ गणपतींचे विसर्जन रथात विसर्जन

व्हायरसपासून घेऊ खबरदारी, पर्यावरणपुरक विसर्जन रथ दारी उपक्रमास प्रतिसाद
ganesh visarjan
ganesh visarjansakal

इंदापूर : इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने श्री गणेश विसर्जन साठी रविवार दि.१९ सप्टेंबर रोजी केलेल्या विसर्जन रथात ५७४ श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यावेळी एक टन निर्माल्य गोळा करण्यात आले.शहरातकोरोना महामारी वाढू नये यासाठी नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आलेल्या या उपाययोजनेस गणेश भक्तांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. नगराध्यक्ष अंकिता मुकुंद शहा, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, नगरपरिषद मुख्याधिकारी रामराजे कापरे, नगरसेवक अनिकेत वाघ, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारकमंडळाचेसचिव मुकुंद शहा यांच्या हस्ते इंदापूर नगरपरिषद प्रांगणात श्री. गणेश विसर्जन रथ तसेच निर्माल्य गोळा करण्यासाठी वाहनांची सकाळी १० वाजता पूजा करण्यात आली. त्यानंतर इंदापूर शहरात १११ वर्ष पूर्ण केलेला तसेच मानाचा पहिला गणपती असलेल्या सिद्धेश्वर मंडळाच्या गणपतीची सकाळी ११ वाजता नगराध्यक्षा अंकिता शहा, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, निवडणूक नायब तहसिलदार दत्तात्रय लवांडे, पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती झाली.

ganesh visarjan
पिंपरी : लाडक्या गणरायाला भाविकांकडून निरोप

यावेळीमंडळाचे अध्यक्ष अतुलकुमार ढोले, महेंद्र बानकर, संतोष घासकाटू, सुनील भंडारी, गणेश मेनसे, अरुण भंडारी यांनी सर्वांचे स्वागत केले. त्यानंतर १०१ वे स्थापनावर्षअसलेल्या मानाचा दुसरा गणपती श्री नृसिंह प्रासादिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीची पूजा इंदापूर रोटरी क्लब चे अध्यक्ष उदय शहा, ऍड. धनंजय विंचू यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष भरत देशमाने, अशोक चिंचकर, अमर लेंडवे,गौरव गानबोटे , योगेश देशमाने, राहुल गानबोटे, गणेश भोज यांनी विधिवत गणेश विसर्जन केले. त्यानंतर सार्वजनिक तसेच घरगुती गणेश मंडळांनी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात रथामध्ये गणरायाचे विसर्जन केले. सायंकाळी सहा वाजेपर्यंत एकूण ५७४ गणेशांचे विसर्जनरथात विसर्जन करण्यात आले तर चार वाहनांमध्ये निर्माल्य गोळा करण्यात आले. या निर्माल्या पासून खत निर्मीती करून नगरपरिषद बागेत

त्याचा वापर करण्यात येणार आहे. सदर विसर्जन रथाचे नियंत्रक म्हणून विलासचव्हाण ,अल्ताफ पठाण, लिलाचंद पोळ, अशोक चिंचकर, सुनील लोहिरे, दिपक शिंदे या नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी काम पाहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com