कळस - इंदापूर तालुक्यातील द्राक्षाची परदेशातील ग्राहकांना चांगलीच भुरळ पडली आहे. तालुक्यातून जंबो द्राक्षाची निर्यात होत असून, यंदा निर्यातदार शेतकऱ्यांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. चीन, दुबई, मलेशिया, थायलंड यांसारख्या देशात येथील द्राक्षाची सर्वाधिक निर्यात होत आहे. परदेशातील ग्राहकांना इंदापूरच्या द्राक्षाच्या गोडीने मोहित केले आहे.