

इंदापूर, ता. २२ : गेल्या अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर इंदापूर शहर व परिसरात मंगळवारी (ता. २२) सायंकाळच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली. जोरदार पावसामुळे शहरातील विविध रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. यामुळे काही ठिकाणी रस्त्यांना अक्षरशः ओढ्याचे स्वरूप आले होते.
तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने खरीप पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची चिंता शेतकऱ्यांना होती. मात्र, मंगळवारी झालेल्या पावसामुळे पिकांना मोठा आधार मिळणार असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले. विशेषतः सुकू लागलेल्या पिकांना जीवदान मिळणार आहे. या पावसामुळे उकाड्याने त्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला, तर पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरात दुपारपासूनच आकाशात ढगांची गर्दी झाली होती. सायंकाळी पावसाला सुरुवात झाल्यानंतर काही वेळातच पावसाचा जोर वाढला. त्यामुळे शहरातील सखल भाग तसेच प्रमुख रस्त्यांवर पाणी साचले. वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाला. दुचाकीस्वारांना पाण्यातून मार्ग काढताना कसरत करावी लागली.
गणेश मंडळांची धावपळ
गणेशोत्सव सुरू असल्याने मुसळधार पावसामुळे शहरातील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची चांगलीच धावपळ उडाली. मंडप परिसरात पाणी साचू नये, सजावटीचे साहित्य तसेच विद्युत व्यवस्था सुरक्षित राहावी, यासाठी कार्यकर्ते तातडीने उपाययोजना करताना दिसून आले. काही मंडळांनी मंडपातील साहित्य सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले. यासाठी मोठी धावपळ पाहायला मिळाली.
08238
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.