इंदापूर - इंदापूर तालुक्याच्या विविध भागांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीने पिकांसह घरांचेही मोठे नुकसान झाले आहे. तालुक्याच्या काही गावांमध्ये पावसाने २०० मिलिमीटरची पातळी ओलांडली..यामुळे अनेक भागांतील घरांमध्ये नदीच्या पात्रातील आणि ओढ्यालगतचे पाणी शिरलेले. मात्र, पोलिस व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने युद्धपातळीवर यंत्रणा राबवून अनेकांचे जीव वाचविले.इंदापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे घडलेल्या घटनांचा अहवाल आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने केलेल्या उपाययोजनांचीही माहिती दिली आहे. याबाबतची गावनिहाय माहिती खालील प्रमाणे...1) निरगुडे : ४० घरांमध्ये ओढ्याचे पाणी शिरलेले आहे. सदर ठिकाणच्या नागरीकांना तत्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले आहे.2) शेटफळगढे : १५ घरांमध्ये ओढ्याचे पाणी शिरलेले आहे. प्रशासन व स्थानिक नागरिकांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन राबवून नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले आहे. तसेच ओढ्याच्या पाण्याकरिता जे.सी.बी. द्वारे स्वतंत्र चर काढून पाणी बाहेर काढण्यात आले आहे.3) निरगुडे : खडकवासला डावा कालवा फुटलेला आहे. सदर ठिकाणी फुटलेल्या कालव्याचे पाणी प्रचंड प्रमाणात आहे..4) सणसर : ओढ्या लगतच्या घरांमध्ये पाणी शिरलेले आहे. सदर ठिकाणचे नागरिकांना तत्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले आहे.5) चिखली : घरांमध्ये नीरा नदीचे पाणी शिरलेले आहे. सदर ठिकाणचे नागरीकांना तत्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले आहे.6) तावशी : १ घर ओढ्याच्या पाण्याने बाधित झालेले आहे. जाधववस्ती ठिकाणी असलेल्या ओढ्यास पूर आल्याने ओढ्यालगत असलेल्या जाधव यांच्या घरासमोर पाण्याचा वेढा आहे. व्यक्ती व जनावरे यांना पाण्याच्या वेढ्यामधून बाहेर काढण्यात आले आहे.7) जांब : जांब या ठिकाणी नीरा नदीवरील बंधाऱ्याचे काम करण्यासाठी आलेले २ कामगार पोकलेन मशिनसह नदीच्या प्रवाहामध्ये अडकले होते. त्यांना सुखरूप बाहेर काढले आहे..उजनी धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढजिल्ह्याच्या अनेक भागांत सुरू असलेल्या मुसळधार पावसाने उजनी धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत चालली असून २७ मे दुपारी बारा वाजेपर्यंत सद्या धरणात ३३ हजार ३७२ क्यूसेकने पाणी येत असून उणे २३ पर्यंत गेलेली उजनी धरणाची पातळी चारच दिवसात प्लस मध्ये आले असून अशीच स्थिती राहिल्यास धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत राहील..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.