इंदापुरात बेकायदा कत्तलखान्यावर छापा

इंदापुरात बेकायदा कत्तलखान्यावर छापा
Published on: 

इंदापूर, ता. १२ : शहरातील कुरेशी गल्ली भागात बेकायदा गोवंश जनावरांची कत्तल सुरू असलेल्या एका घरावर इंदापूर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत २ लाख रुपयांचे गोमांस आणि जिवंत जनावरे जप्त करण्यात आली असून, संशयित आरोपी शब्बीर बाबुलाल कुरेशी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस शिपाई विठ्ठल भारत गिरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिस उपनिरीक्षक कोल्हे आणि पथकाने कुरेशी गल्ली येथील शब्बीर कुरेशी याच्या घराशेजारील शेडवर छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी शब्बीर कुरेशी अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला. घटनास्थळी जनावरांना क्रूर परिस्थितीत डांबून ठेवल्याचे आणि जमिनीवर मांस व कातडी पडल्याचे आढळून आले.
या कारवाईत पोलिसांनी ६० हजार रुपये किमतीचे ३ जर्सी बैल, ९० हजार रुपयांच्या ६ जर्सी गाई, १० हजार रुपयांचे २ जर्सी खोंड, १५ हजार रुपयांचा १ रेडा आणि २५ हजार रुपये किमतीचे २५० किलो मांस असा एकूण २ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जप्त केलेली जिवंत जनावरे सुरक्षिततेसाठी गोशाळेत पाठवण्यात आली आहेत. मांसाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले असून उर्वरित मांसाची इंदापूर नगरपालिकेमार्फत विल्हेवाट लावण्यात आली आहे. फरार आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती इंदापूर पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com