esakal | Indapur : प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभासदांना कर्ज वाटप
sakal

बोलून बातमी शोधा

Indapur : प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभासदांना कर्ज वाटप

Indapur : प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभासदांना कर्ज वाटप

sakal_logo
By
डॉ. संदेश शहा - सकाळ वृत्तसेवा

इंदापूर : इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्था संचालक मंडळाच्या मासिक सभेतील ठरावा नुसार सभासदांना दि. १२ सप्टेंबर पासून २० लाख रुपयांचे कर्ज वाटप ९% या अल्प व्याजदराने करण्यास सुरुवात करण्यात आल्याची माहिती पतसंस्थेचे अध्यक्ष ज्ञानदेव चव्हाण यांनी दिली.

श्री. चव्हाण पुढे म्हणाले, इंदापूर शिक्षक पतसंस्था सभासदांना मुदत ठेवी व कायम ठेवीवर १०% एवढा व्याजदर देते तर २० लाख रुपये कर्जावर ९% व्याजदर आकारते. संस्था पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ३३ कोटी रुपये १०.५०% दराने कर्जवापरते .सभासदांना व्यापारी संकुल गाळे,सांस्कृतिक भवन यामधून मिळणाऱ्या उत्पन्नातून आता पर्यंत १.२५ कोटी रुपये एवढा लाभांशरुपाने परतावा देण्यात आला असून सभासदांच्या आर्थिक हितास सर्वोच्च प्राधान्य देण्यास कटिबद्ध आहे.

हेही वाचा: पोटनिवडणुका पुढे ढकलण्यासाठी राज्य सरकार अध्यादेश काढणार : छगन भुजबळ

सचिव संजय लोहार म्हणाले, संस्थेचे भाग भांडवल १९ कोटी २६ लाख १९ हजार ८४६ रुपये असून सभासद कायम ठेव १३ कोटी १३ लाख ५८ हजार ५८० रुपये आहे. संचित ठेव १ कोटी २८ लाख ५२ हजार ५०० रुपये असून बँक गुंतवणूक ६ कोटी ६५ लाख १२ हजार ३१३ रुपये आहे. स्थावर मालमत्ता ३ कोटी १८ लाख ६१ हजार १५२ रुपये असून सभासद कर्जवाटप ६९ कोटी ५० लाख ९३ हजार ७८२ रुपये आहे. खेळते भांडवल ७९ कोटी ७९ लाख ९६ हजार ८५ रुपये असून वार्षिक उलाढाल १२१ कोटी ८६ लाख १६ हजार १०२ रुपये आहे. अ वर्ग लेखा परीक्षण असलेल्या पत संस्थेने सहकारातील नामांकीत पतसंस्था, असा नावलौकिक संपादन केला असून संस्थेची १०० वर्ष पूर्णत्वाकडे वाटचाल सुरू आहे.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष वसंत फलफले, संचालक ज्ञानदेव बागल, हरीश काळेल, सुनिल वाघ, किरण म्हेत्रे, नितीन वाघमोडे, संभाजी काळे, विलास शिंदे, सौ. सुनंदा बोके, सुभाष भिटे, हनुमंत दराडे,आदिनाथ धायगुडे, नानासाहेब नरुटे, बालाजी कलवले, दत्तात्रय ठोंबरे उपस्थित होते.

loading image
go to top