esakal | Indapur: महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचार्यांचे मोबाईल वापसी आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

indapur

Indapur: महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचार्यांचे मोबाईल वापसी आंदोलन

sakal_logo
By
डॉ. संदेश शहा - सकाळ वृत्तसेवा

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या इंदापूर शाखेच्या वतीने इंदापूर पंचायत समिती आवारात मोबाईल वापसी आंदोलन करण्यात आले. इंदापूर अंगणवाडीसंघटनेच्या अध्यक्ष बकुळा शेंडे, उपाध्यक्ष सुदर्शना भुजबळ, सचिव सुनीता कदमयांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनातशेकडो अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या. यावेळी ४११ मोबाईल एकात्मिक महिला व बालकल्याण विभाग कार्यालयात ठेवण्यात आले.

यावेळी अध्यक्ष बकुळा शेंडे म्हणाल्या,पोषणअभियानाअंतर्गत अंगणवाडी सेविकांना सन २०१९ मध्ये शासकीय कामासाठी मोबाईल वाटप करण्यात आले असून सदर मोबाईल ची मुदत मे २०२१ ला संपली आहे. हा मोबाईल २ जी बी रॅम क्षमतेचा असून या मध्ये लाभार्थींची नावे, हजेरी, वजन,उंची, स्तनदा व गर्भवती मातांची माहिती, पोषण आहाराचे वाटप ही माहिती भरण्यात येते. मोबाईलची क्षमता कमी असल्याने व त्यामध्ये भरावयाची माहिती जास्त असल्याने मोबाईल सारखे हँग होत आहेत. त्यामुळे मोबाईल गरम होऊन ते बंद पडत आहेत. त्याच्या दुरुस्तीसाठी येणारा ३ ते ६ हजार रुपयेखर्च अंगणवाडी सेविकांना करावा लागत आहे.हे ऍप इंग्लिश भाषेत असल्याने माहितीभरण्यास अडचण येत आहे.

राज्याची राजभाषामराठी असताना इंग्लिशमध्ये माहिती भरण्याची सक्ती केली जात आहे.माहिती न भरल्यासमानधन न देण्याची तसेच दंडात्मककार्यवाहीकरण्याची धमकी अधिकाऱ्यांकडून दिली जात आहे. हे काम चांगले होण्यासाठी दर्जेदार मोबाईल द्यावेत, मराठी भाषेमध्ये निर्दोष पोषण ट्रॅकर ऍप द्यावे या आमच्या मागण्या आहेत. यावेळी सीमा खामगळ, शोभा जाधव, बालिका राऊत, छाया भोंग, वैशाली गार्डे उपस्थित होत्या.

दरम्यान एकात्मिक प्रकल्प अधिकारी संदीप काळे म्हणाले, अंगणवाडी सेविकांच्यामागण्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवल्या आहेत. मात्र मोबाईल परत घेण्याच्या त्यांच्या सूचना नसल्यानेअंगण वाडी सेविकांना त्यांच्या जबाबदारीवर मोबाईलठेवावेत.

loading image
go to top