इंदापूर पोलिसांची अवैध वाळूसाठ्यावर कारवाई; ५ लाखांचा ऐवज जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Illegal sand Transport

इंदापूर पोलिसांची अवैध वाळूसाठ्यावर कारवाई; ५ लाखांचा ऐवज जप्त

इंदापूर : इंदापूर पोलिसांनी उजनी धरण पाणलोट क्षेत्रात दि. १७ मार्च रोजी मौजे कालठण नं.२ येथे अवैध वाळू साठ्यावर कारवाई करून ५ लाख रुपयांचा ऐवज हस्तगत केला. पोलीस रोशन मुठेकर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात इसमा विरोधात वाळूतस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी झारीतील शुक्राचार्य कोण आहे याची चौकशी सुरू केल्याने अवैध वाळूव्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.

मौजे कालठण नं.२ ( ता. इंदापूर ) गावच्या हद्दीत नदीकाठी असलेल्या ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विहिरीजवळ अज्ञातइसमाने ५ लाख रुपये किंमतीचा वाळू या गौण खनिजाचा बेकायदेशीर साठा केलेला आढळून आला. सदर वाळू उजनी धरणाच्या पाण्यामध्ये असल्याने वाहतूक करता येत नसल्याने त्याचा साठा करून ठेवण्यात आला होता.

हेही वाचा: विरोधकांनी काड्या केल्यामुळे ५ टीएमसी पाणी रद्द : दत्तात्रेय भरणे

सदर वाळूचे मोजमाप दंडात्मक कारवाई करण्याकरता तहसीलदार श्रीकांत पाटील, नायब तहसीलदार अनिल ठोंबरे व त्यांच्या पथकाने केले. वाळू काढण्यासाठी असलेली सक्शन बोट उजनी धरणाच्या पाण्यामध्ये असल्याने इंदापूर पोलिसांनी रात्रभर थांबून दि. १८ मार्च रोजी सकाळी वाजता दोन हायड्रॉलिक क्रेन व कंटेनरच्या सहाय्याने इंदापूर पोलीस स्टेशन येथे आणली.

अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, बारामती उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे, इंदापूर पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाडुळे पुढील तपास करत आहेत.

Web Title: Indapur Police Action Illegal Sand Transport

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..