

शेटफळगढे, ता. ८ : इंदापूर तालुक्यातील शेटफळगढे प्राथमिक आरोग्य केंद्रातील शासकीय औषधसाठा चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी महिला डॉक्टरांविरोधात भिगवण पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषध निर्माण अधिकारी मनिषा बिसेन या २ नोव्हेंबर रोजी रजेवर होत्या. ३ नोव्हेंबरला कामावर आल्यानंतर औषधसाठ्याची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात तफावत आढळली. यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल थोरात यांनी वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली. दरम्यान, नागरिकांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता रात्रीच्या वेळी औषधांची पोती नेली जात असल्याचे निदर्शनास आल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणी ६ नोव्हेंबर २०२६ रोजी भिगवण पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या नोंदीनुसार, डॉ. स्नेहल कारंडे यांनी ४ हजार ५७ रुपये किमतीची औषधे नेल्याचा आरोप आहे.
या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार नानासाहेब सूर्यवंशी करत असून, औषधसाठा हस्तगत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गरजू रुग्णांसाठी असलेल्या मोफत औषधांच्या सुरक्षेचा प्रश्न या घटनेमुळे ऐरणीवर आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.