इंदापूरच्या तहसीलदारांवर कारवाई करण्याची मागणी

इंदापूरच्या तहसीलदारांवर
कारवाई करण्याची मागणी
Published on

इंदापूर, ता. ६ : महसूल विभागातील कामांमधील दिरंगाई आणि ‘महसूल समाधान शिबिरात’ महापुरुषांची प्रतिमा न लावल्याचा ठपका ठेवत इंदापूरच्या तहसीलदारांना निलंबित करण्याची मागणी भाजपचे जिल्हा महामंत्री डॉ. आकाश कांबळे यांनी केली आहे. न्याय न मिळाल्यास तहसीलवर मोर्चा काढण्याचा इशाराही त्यांनी दिला.
इंदापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. कांबळे बोलत होते. तालुक्यात शेतकऱ्यांच्या रस्त्यांचे प्रश्न प्रलंबित असून, स्थळ पाहणीसाठी शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. उजनी धरण क्षेत्रातील वाळू उपसा आणि जमीन प्रकरणांतील अनियमिततेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. या वेळी राजकुमार जठार, राम आसबे, किरण गानबोटे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

सर्व आरोप निराधार : तहसीलदार
भाजपचे सर्व आरोप तहसीलदार जीवन बनसोडे यांनी फेटाळून लावले आहेत. प्रशासन नागरिकांना उत्तम सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील असून, काही तक्रारी असल्यास संबंधितांनी लेखी खुलासा करावा, त्यांना सविस्तर माहिती दिली जाईल, असे बनसोडे यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com