इंदापूर : एस. टी कामगारांच्या समर्थनार्थ इंदापूर बस स्थानकासमोर रस्ता रोको

एस.टी. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या समर्थनार्थ बहुजन मुक्ती पार्टी व भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने इंदापूर बस स्थानकासमोर रास्ता रोको
इंदापूर : एस. टी कामगारांच्या समर्थनार्थ इंदापूर बस स्थानकासमोर रस्ता रोको
इंदापूर : एस. टी कामगारांच्या समर्थनार्थ इंदापूर बस स्थानकासमोर रस्ता रोकोsakal
Updated on

इंदापूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संघटना विरहीत एस.टी. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या समर्थनार्थ बहुजन मुक्ती पार्टी व भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने पार्टीचे राष्ट्रीय महासचिव ऍड. राहुल मखरे यांच्या नेतृत्वा खाली इंदापूर बस स्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे

शहरातून जाणाऱ्या जुन्या पुणे सोलापूर महामार्गावर दुतर्फा वाहनांची गर्दी झाली होती. त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली. यावेळी इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

यावेळी ऍड. राहुल मखरे म्हणाले, दि. २८ ऑक्टोबर २०२१ पासून एस.टी.महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी निरंतर आंदोलन सुरु केले आहे. राज्य शासन व एस.टी. प्रशासनाने त्यांच्या मागण्या मंजूर न केल्याने आजपर्यंत एस.टी.च्या ३६ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. याबाबत राज्य शासन व एस. टी. प्रशासनाचा बहुजन मुक्ती पार्टी व भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करत आहे. एस. टी. महामंडळाचे शासनात विलिनीकरण करावे,

इंदापूर : एस. टी कामगारांच्या समर्थनार्थ इंदापूर बस स्थानकासमोर रस्ता रोको
ST Strike : हायकोर्टाच्या आदेशाचा आदर करा, अन्यथा...; परबांचा इशारा

एस.टी.कोऑपरेटिव्ह बँकेची कर्जमाफी करावी,आत्महत्याग्रस्त कर्मचाऱ्यांच्या परिवारास त्वरीत किमान ५० लाख रुपये द्यावेत, मृत कर्मचाऱ्यांच्या परिवारातील एका सदस्याला त्वरीत नोकरी द्यावी, एस.टी. ची जाचक नियामवली रद्द करून त्यात काळानुरूप बदल करावेत, एस. टी. कर्मचाऱ्यांचे प्रलंबित करार पुर्ण करावेत या कामगारांच्या रास्त मागण्या आहेत. या कामगारांच्या रास्त मागण्यासाठी राज्यात सर्वप्रथम आम्ही रस्त्या वर आलो आहे.येत्या दोन दिवसात शासनाने या मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल.

यावेळी संजय शिंदे म्हणाले, सुरक्षित प्रवासासाठी सर्वजण एस टी प्रवासास प्राधान्य देतात. त्यामुळे एस टी त ज्यादा सुविधा उपलब्ध करून देण्याऐवजी याचे खाजगीकरण करण्याचा सरकार प्रयत्न करत असून कामगारांची गळचेपी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तो कदापी यशस्वी होवू दिला जाणार नाही. कामगारांना न्याय आल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब भोंग, शहराध्यक्ष संतोष क्षीरसागर ,राहुल शिंगाडे, वसीम शेख,सुरज धाइंजे, ऍड. किरण लोंढे, भारत मिसाळ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com