पाटील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची आय.टी. कंपन्या मध्ये निवड : शिरकांडे

एस. बी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय विद्यार्थ्यांची आय.टी.कंपन्यांमध्ये निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ.एस.टी.शिरकांडे यांनी दिली.
एस. बी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय
एस. बी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयSakal

इंदापूर : इंदापूर नजीक वनगळी येथील शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठान संचलित एस. बी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय विद्यार्थ्यांची आय.टी.कंपन्यांमध्ये निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ.एस.टी.शिरकांडे यांनी दिली.

प्राचार्य डॉ. शिरकांडे पुढे म्हणाले, कॉग्नीझांट कंपनी मध्ये मयुर खटावकर ( मेकॅनिकल विभाग), रेश्मा घुले,निखिल काकडे(कम्प्युटर विभाग,विप्रो कंपनी मध्ये सोनाली घोळवे (सिव्हिल विभाग ), दत्तात्रय मगर, चैतन्य मगर, साक्षी गांधी, अंजली क्षीरसागर ( सर्व कॉम्पुटर विभाग ),टी.सी.एस या नामांकित कंपनीत अनिकेत कणसे, अविनाश पाटील, दत्तात्रय मगर, चैतन्य मगर, साक्षी गांधी, प्रगती खोडावे, प्राजक्ता देवकर, संजना गांधी, धवलसिंग पाटील, योगेश कटमवार ( सर्व कम्प्युटर विभाग ),मयुर खटावकर, अक्षय शिंदे, प्रसाद निंबाळकर ( मेकॅनिकल विभाग), किर्ती निंबाळकर ( इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन विभाग ) या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

एस. बी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय
इंदापूर : निमसाखरच्या बंधाऱ्याच्या भराव खचला

यावेळी प्राचार्य डॉ.एस.टी.शिरकांडे म्हणाले ,महाविद्यालयाचा नामांकित कंपन्यांशी सामं जस्य करार असल्याने गुणवत्तापूर्ण शिक्षणा बरोबरच विविध विषयांचे प्रशिक्षण व प्लेस मेंटमध्ये महाविद्यालय अग्रेसरआहे. विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या प्रोजेक्ट बेस्ड लर्निंगचा विद्यार्थ्यांना प्लेसमेंटसाठी फायदा होत आहे. महाविद्यालयाच्या इंटर्प्रिनरशिप डेव्हलपमेंट सेल अंतर्गत देखील विद्यार्थ्यांना करिअरच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा.एस.पी. कांबळे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी कॉलेजमध्ये सॉफ्ट स्किल डेव्हलोपमेंट, फॉरेन लँग्वेज कोर्सेस, अँप्टीट्युड टेस्ट, मॉक इंटरव्हिव असे विविध उपक्रम नेहमी राबिवले जातात. त्याचा लक्षवेधी फायदा दिसून येत आहे.

संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, सचिव भाग्यश्री पाटील, उपाध्यक्षा अंकिता पाटील आणि विश्वस्त राजवर्धन पाटील यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com