

इंदापूर, ता. १४ : राज्य शासनाच्या सौर कृषी पंप योजनेंतर्गत (कुसुम सौर कृषी पंप योजना) अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना महावितरणच्या नावाखाली फोन करून गंडा घालण्याचे प्रकार समोर येत आहेत. पडताळणीच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून फोनवर ओटीपी घेऊन त्यांच्या नकळत व इच्छेविरुद्ध विशिष्ट सौर कंपन्यांची निवड केल्याचे प्रकार घडत असून, यामुळे शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शेतकऱ्यांनी महावितरणकडे सौर कृषिपंपासाठी अर्ज केल्यानंतर, काही संशयित व्यक्ती महावितरणचे अधिकारी किंवा वायरमन असल्याचे भासवून शेतकऱ्यांना फोन करतात. पडताळणी पूर्ण करण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून ओटीपी मागवून घेतला जातो. हा ओटीपी मिळताच शेतकऱ्यांच्या नकळत व त्यांच्या परवानगीशिवाय परस्पर बोगस किंवा नको असलेल्या सौर कंपन्यांची निवड केली जात आहे.
याबाबत बाभूळगाव येथील शेतकरी प्रदीप आबासाहेब गुरगुडे यांच्या बाबतीतही असाच प्रकार घडला असून, याप्रकरणी गुरगुडे यांना कंपनीच्या नावाखाली फोन करत त्यांच्या परस्पर दुसऱ्याच कंपनीची निवड करून फसवणूक केली आहे. अनेक शेतकरी अद्याप आपल्या शेतात इतर पिकांच्या कामात व्यस्त असताना, त्यांच्या नावावर अशा प्रकारे परस्पर ऑनलाईन फसवणूक केली जात असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार करणार असल्याचे गुरगुडे यांनी सांगितले.
दरम्यान, याबाबत महावितरण कंपनीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तो होऊ शकला नाही.
फसवणूक करणाऱ्या कंपन्या आणि एजंटांवर कठोर कारवाई करावी. शेतकऱ्यांची परस्पर केलेली चुकीची कंपनी निवड रद्द करून त्यांना स्वतःच्या पसंतीची कंपनी निवडण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. महावितरण प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबवावी.
- दीपक गुरगुडे, बाभूळगाव (ता. इंदापूर)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.