इंदापूर : प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन पॅनलचा विजय

हर्षवर्धन पाटील यांच्या पॅनलची पंधरा वर्षाची असलेली सत्ता संपुष्टात
स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन पॅनलचा विजय
स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन पॅनलचा विजयsakal

वडापुरी : इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या ता. 24 रोजी झालेल्या निवडणुकीत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन पॅनलचा दणदणीत विजय झाला असून एकवीसच्या एकवीस जागा जिंकून हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक समिती पुरस्कृत शिक्षक विकास पॅनलची पंधरा वर्षाची असलेली सत्ता संपुष्टात आणली.

ता. २४ एप्रिल रोजी सन २०२२-२७ या कालावधीसाठी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत स्वाभिमानी शिक्षक परिवार पुरस्कृत स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन पॅनलने २१ विरूद्ध ० अशा फरकाने दणदणीत विजय मिळवून हर्षवर्धन पाटील यांच्या गटाला जोरदार धक्का देत प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेवर सत्ता मिळविण्यात यश मिळविले आहे.

पॅनल प्रमुख नानासाहेब नरूटे यांचे नेतृत्वाखाली स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन पॅनलने २१ उमेदवारासह संचालक मंडळाची निवडणुक लढविली.सकाळी ८ ते ४ या वेळेत इंदापूर येथील कस्तुरबाई श्रीपती कदम विद्यालय येथे मतदान झाले, यावेळी ९८.६४ टक्के मतदान झाले. त्यानंतर इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या कर्मयोगी शंकरराव पाटील सांस्कृतिक भवन येथे मतमोजणी झाली मतमोजणीत स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन पॅनलने सुरुवाती पासूनच घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवत २१ जागेवरती विजय मिळविला.

स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन पॅनल मधून निवडुन आलेले उमेदवार पुढीलप्रमणे.प्रशांत रामचंद्र घुले, शशिकांत किसन शेंडे,सुहास नामदेव मोरे,दत्तात्रय अजिनाथ ठोंबरे, अनिल उत्तम शिंदे, सतिश विठ्ठल दराडे, बालाजी श्रावन कलवले, भारत तात्याराम बांडे, अजिनाथ विठ्ठल धायगुडे, संतोष दादाराम गदादे, सदाशिव सजन रणदिवे,संजय सोपान म्हस्के, सतिश सावळाराम गावडे, भाऊसो जगनाथ वणवे,संतोषकुमार तानाजीराव तरंगे,दत्तात्रय सदाशिव चव्हाण,रामचंद्र बलभिम शिंदे, संजिवणी उद्धव गरगडे,संगीता सुरेश पांढरे, सचिन भानुदास देवडे, किशोर राजाराम वाघ अशी विजयी उमेदवारांची नावे असुन निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन सहाय्यक निबंधक जे.पी.गावडे यांनी काम पाहीले.

पंधरा वर्षापासून हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यात असलेली सत्ता मोडीत काडून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी तालुक्यात आपलाच वर चष्मा असल्याचे पुन्हा या निवडणुकीत दाखवून दिले. एकवीसच्या एकवीस जागा जिंकल्या नंतर मात्र शिक्षकांनी एकच जल्लोष केला, गुलालाची उधळण करीत हलागीच्या तालावर शिक्षकांसह महिलां शिक्षकांनी सुद्धा आनंद उत्सव साजरा केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com