esakal | इंदापूरमध्ये कोरोनाचा हाहाकार, एकाच दिवसात उच्चांकी १३ रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

corona

काल इंदापूर शहरात एक व तालुक्यात दोन, असे कोरोनाचे तीन रुग्ण आढळले होते. त्यानंतर प्रशासनाने त्यांच्या थेट संपर्कात आलेल्या ३७ जणांच्या घश्यातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. त्याचा अहवाल आज आला. त्यात

इंदापूरमध्ये कोरोनाचा हाहाकार, एकाच दिवसात उच्चांकी १३ रुग्ण

sakal_logo
By
डॉ. संदेश शहा

इंदापूर (पुणे) : इंदापूर शहर व तालुक्यात आज कोरोना व्हायरस संसर्गाचे एकाच दिवशी उच्चांकी १३ रुग्ण आढळून आले. त्यामुळे तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या ३८ झाली असल्याची माहिती तहसीलदार सोनाली मेटकरी व उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे यांनी दिली.   

जिल्ह्यात हरघर गोठे, घरघर गोठे...

काल इंदापूर शहरात एक व तालुक्यात दोन, असे कोरोनाचे तीन रुग्ण आढळले होते. त्यानंतर प्रशासनाने त्यांच्या थेट संपर्कात आलेल्या ३७ जणांच्या घश्यातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. त्याचा अहवाल आज आला. त्यात इंदापूर शहरातील एका कोरोनाबाधित व्यापाऱ्याच्या घरातील 5 जण, जंक्शन गावातील कोरोनाबाधित 35 वर्षीय महिलेच्या संपर्कातील 3 जण, तर शेळगाव येथील 32 वर्षीय रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 5 जणांना कोरोना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, इंदापूर तालुक्यात गेल्या 12 दिवसांत 19 रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये दडपण वाढले आहे. इंदापूर शहरात महतीनगर परिसर सील करण्यात आला असून, नागरिकांनी शासन आदेशाचे पालन करावे, असे आवाहन नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा व मुख्याधिकारी डॉ. प्रदिप ठेंगल यांनी केले आहे.