पुणे जिल्ह्यातील 'या' तालुक्याची शहर स्वच्छतेत हॅटट्रिक

संदेश शहा
Sunday, 23 August 2020

स्वच्छ भारत सर्वेक्षण 2020 मध्ये इंदापूर नगरपरिषदेने देशपातळीवर चौदावा तर पश्‍चिम विभागात सातवा क्रमांक पटकावीत विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली.

इंदापूर (पुणे) : स्वच्छ भारत सर्वेक्षण 2020 मध्ये इंदापूर नगरपरिषदेने देशपातळीवर चौदावा तर पश्‍चिम विभागात सातवा क्रमांक पटकावीत विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली. सेक्रेटरी मिनिस्ट्री ऑफ हाउसिंग अँड अर्बन अफेअर्सकडून याची ऑनलाइन घोषणा झाल्यानंतर नूतन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी इंदापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा अंकिता शहा, मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांचा पुणे येथे सन्मान केला.

आंबेगाव, जुन्नर, शिरूरकरांसाठी दिलासादायक बातमी : डिंभे धरण भरण्याच्या मार्गावर

यावेळी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, नगरपरिषदेचे माजी मुख्याधिकारी रामनिवास झंवर, कर्मचारी अल्ताफ पठाण, अशोक चिंचकर, विलास चव्हाण उपस्थित होते. पश्‍चिम विभागात एकूण पाच राज्यांत इंदापूर नगरपरिषदेने सातवे तर देशातील 1 लाख लोकसंख्येत सर्वोत्कृष्ट 100 शहरांमध्ये सातवा क्रमांक देखील मिळवला आहे. पाच राज्यातील बेस्ट सेल्फ सस्टेनॅब्लीटी शहर म्हणून देखील इंदापूर शहरास बहुमान मिळाला आहे. इंदापूर नगरपरिषदेस या स्पर्धेतून एकूण पाच कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. 

 कात्रजमधील सराईताच्या खुनप्रकरणी आणखी एका आरोपीस अटक

स्वच्छ भारत या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा इंदापूर शहराचा गौरव झाला. त्याचे श्रेय शहरातील नागरिक, व्यापारी, उद्योजक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, सर्व नगरसेवक व नगरपरिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मेहनतीस आहे. यापुढे देखील अग्रक्रमांक येण्यासाठी आम्ही सर्व संघटित प्रयत्न करू. 
- अंकिता शहा, नगराध्यक्षा 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indapur taluka hat trick in city cleanup