

Pune
esakal
संतोष आटोळे
इंदापूर: इंदापूर शहरातील वाढती वाहतूक कोंडी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली असून, यावेळी या कोंडीचा फटका थेट एका रुग्णवाहिकेला बसल्याची घटना समोर आली आहे. अत्यावश्यक वैद्यकीय सेवेसाठी धावणारी रुग्णवाहिका वाहतुकीच्या कोंडीत अडकून पडल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, शहरातील वाहतूक व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.