esakal | Indapur: उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

उजनी धरण

इंदापूर : उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग सुरू

sakal_logo
By
डॉ. संदेश शहा - सकाळ वृत्तसेवा

इंदापूर : भिमानगर ( ता. माढा जि. सोलापूर ) येथील उजनी धरणात सातत्याने दौंड येथून पाणी विसर्ग मोठया प्रमाणावर वाढतअसल्यामुळे दि. १० ऑक्टोबर रोजी धरणाचे १६ दरवाजे उघडून भीमा नदी पात्रात दुपारी ४ वाजेपासून २५ हजार क्यूसेक पाणीसोडण्यात येत आहे. त्यामुळे नदी काठच्या गावी सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे, उजनी धरण व्यवस्थापनाचे रावसाहेब मोरे उजनी धरण पाणी पातळीवर लक्ष ठेवून निर्णय घेत आहेत. राज्याचे सामान्य प्रशासन राज्य मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उजनी धरणातील पाणी वापरावर प्रथमपासून लक्ष ठेवल्यास उन्हाळ्यात इंदापूर तालुक्यास पाणी कमी पडणार नाही.

शनिवारी दि. ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी

सहा वाजता उजनी धरणात १०७.६२ टक्के

पाणी होते. पुणे जिल्ह्यात पडत असलेल्या पावसामुळे रात्री आठ वाजता बंडगार्डन येथून

३२८०, निघोज इंद्रायणी नदीतून ११००, पारगाव येथून ५५०० तर दौंड येथून ८८०० क्यूसेक पाणी विसर्ग दौंड येथे भीमा नदीत मिसळत होता. त्यातच परतीच्या पावसाचा जोर वाढल्याने उजनी धरणात पाणी विसर्ग वाढला. ५ ऑक्टोबर रोजी उजनी धरणात १०० टक्के पाणी साठा झाल्यानंतर पुणे जिल्ह्यातील लाभक्षेत्रातील धरणात पावसाचे प्रमाण वाढल्याने उजनी धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. रात्री ५ हजार कुसेकने भीमा नदीत पाणीसोडल्यानंतर

दि. १० ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता

१० हजार, दुपारी ११ वाजता २० हजार तर दुपारी ४ वाजेपासून २५ हजार क्यूसेक पाणी भीमा नदीत सोडण्यात आले आहे.

उजनी धरणाची पाणी पातळी ४९७.२६० मीटर असून एकूण साठा १२२.४२ टीएम सी आहे. धरणात उपयुक्त पाणी साठा ५८.७६ टीएमसी असून धरणात १०८.६८ टक्के पाणी आहे. दौंड येथून १३९३८ क्यूसेक पाणी भीमा नदीतून धरणात येत असून धरणाची पाणी पातळी सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पुणे, नगर

व सोलापूर जिल्ह्यास वरदान ठरलेल्या उजनी धरणातील पाण्यावर अनेकांचा डोळा आहे. त्यामुळे धरणातील पाण्याचे काटेकोरनियोजन

न केल्यास उजनीचे पाणी भविष्यात पेटण्याची शक्यता आहे.

फोटो : इंदापूर - भिमानगर ( ता. माढा ) येथील उजनी धरणाचे १६ दरवाजे उघडून भीमा नदीत सोडण्यात आलेल्या पाण्याचे विहंगम दृश्य.

loading image
go to top