

बावडा, १८ : इंदापूर तालुक्यातील भीमा नदी कोरडी पडल्याने बावडा, पिंपरी बुद्रुक आणि भांडगाव परिसरात पाणीटंचाई तीव्र झाली आहे. उजनी धरणातून तातडीने पाणी सोडून नदीवरील बंधारे पूर्ण क्षमतेने भरण्याची मागणी ग्रामस्थांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा असतानाही इंदापूरच्या नदीकाठच्या गावांना टंचाईचा सामना करावा लागत आहे. यामुळे शेतीचे नुकसान आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाचे इंदापूर विधानसभा अध्यक्ष अभिजित घोगरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, ग्रामविकास व पालकमंत्री जयकुमार गोरे आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे पाणी सोडण्याबाबतचे निवेदन दिले आहे.
उजनीतून पाण्याचा विसर्ग सुरू करून लाभक्षेत्राच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचवावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
आंदोलन छेडण्याचा इशारा
बावडा ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तर पिंपरी बुद्रुक आणि भांडगाव ग्रामपंचायतींनी जलसंपदा विभागाकडे स्वतंत्र निवेदने दिली आहेत. प्रशासनाने तातडीने कार्यवाही न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. आता शासन आणि जलसंपदा विभाग यावर काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.