इंदापूरच्या पश्चिम भागात पाणी प्रश्न गंभीर

इंदापूरच्या पश्चिम भागात पाणी प्रश्न गंभीर
Published on: 

उद्धट, ता. २६ : इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाअभावी पाणीटंचाई तीव्र झाली आहे. नीरा नदीचे पात्र कोरडे पडल्याने शेतीसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर कळंब, चिखली आणि कुरवली परिसरातील शेतकऱ्यांनी नीरा नदीत पाणी सोडून नदीवरील बंधारे भरून द्यावेत, अशी मागणी कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्याकडे रविवारी (ता.२५) निवेदनाद्वारे केली आहे.

पावसाने ओढ दिल्याने पश्चिम भागातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. नदीपात्रातील पाणी कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता होत नाही. तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठीही अडचणी निर्माण झाल्या आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना दैनंदिन वापराच्या पाण्याची चिंता सतावत असल्याने प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने कृषिमंत्री भरणे यांची भेट घेऊन परिस्थितीची माहिती दिली. यावेळी कळंब, चिखली आणि कुरवली परिसरातील पाणीटंचाईकडे लक्ष वेधत शेती, जनावरे आणि ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याची मागणी करण्यात आली.
या वेळी इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विलास माने, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक दत्तात्रेय सपकळ, कळंबचे युवा नेते जय फडतरे, चिखलीचे सरपंच शिवाजी अर्जुन, जांबचे सरपंच समाधान गायकवाड, कुरवलीचे सरपंच राहुल चव्हाण, दिलीप पांढरे, मारुती जाधव, मधुकर खरात, तसेच पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते.
दरम्यान, नीरा नदीत पाणी सोडण्याबाबत तातडीने निर्णय न झाल्यास सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आंदोलन करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com