वा रे पठ्ठ्या, उजनीत धरणात बुडत होते सहा जण... 

प्रा. प्रशांत चवरे
Tuesday, 12 May 2020

तीन लहान मुले उजनी धरणाच्या पाण्यामध्ये उतरली, मात्र पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडू लागली. महिलांनीही त्यांना वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली

भिगवण (पुणे) : इंदापूर तालुक्‍यातील तक्रारवाडी येथे उजनी धरणाच्या पाण्यात बुडू लागलेल्या तीन महिला व तीन मुलांचे प्राण राजू नंदू परदेशी (रा. तक्रारवाडी) या मच्छीमाराच्या प्रसंगावधानामुळे वाचले. 

पुण्याची जिद्दी कन्या, बाळंतपणातून उठून लढतेय ओडिशात कोरोनाची लढाई...  

तक्रारवाडी येथील काही महिला व लहान मुले कामानिमित्त उजनी धरणाच्या पाणी फुगवट्याच्या बाजूला गेली होती. तीन लहान मुले पाण्यामध्ये उतरली व काही अवधीनंतर पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडू लागली. मुले पाण्यात बुडू लागल्याचे दिसताच महिलांनीही त्यांना वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली, परंतु त्यांनाही पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे मुलांसह महिलाही पाण्यामध्ये बुडू लागल्या. 

अनधिकृत बांधकामे असतील तर सावधान, या ठिकाणी कारवाई सुरू... 

हा प्रकार उजनी धरणाच्या पाण्याच्या फुगवट्याजवळ राहुटीमध्ये राहणाऱ्या मच्छीमार कुटुंबाला आला. तेथील मच्छीमार तरुण राजू परदेशी याने प्रसंगावधान राखत तातडीने पाण्यामध्ये उडी घेत या महिला व मुलांना पाण्याबाहेर काढत जीवनदान दिले. त्याने केलेल्या या धाडसी कृत्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा  

याबाबत भिगवण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने यांनी सांगितले की, या तरुणाने तीन महिला व तीन मुलांचे प्राण वाचविले आहे. याबाबत पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांना कल्पना दिली. त्यांनी तरुणाचे नाव राष्ट्रपती जीवन रक्षक पदकासाठी पाठविण्याची शिफारस केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: indapur, A young fisherman rescued six people who drowned in the Ujani dam