ssc exam result
sakal
इंदापूर - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या फेब्रुवारी 2026 च्या परीक्षेत इंदापूर तालुक्यातील 30 शाळा शंभर नंबरी ठरल्या असून या शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. तालुक्याचा एकूण सरासरी निकाल 95.27 टक्के लागला आहे.गेल्या वर्षीच्या निकालाच्या तुलनेत तालुक्याच्या टक्केवारी एक टक्याने अधिक घट झाली आहे. शंभर नंबरी शाळांच्या संख्येतही 12 ने घट झाली आहे.