Indefinite Protest Begins Over Road Issues in Thakarwadi
sakal
घोडेगाव - आंबेगाव तालुक्यातील आदिवासी ठाकर समाजाच्या विविध वाड्या-वस्त्यांवरील रस्त्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, या मागणीसाठी 'आदिवासी ठाकर संघर्ष संघटना' संलग्न: आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच यांच्या वतीने घोडेगाव, ता. आंबेगाव येथील तहसीलदार कार्यालय, यांना निवेदन देण्यात आले आहे. रस्त्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आज पासून तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे.