अक्कलकोट तालुक्यात स्वातंत्र्यदिनाचा जयघोष; विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा

अक्कलकोट तालुक्यात स्वातंत्र्यदिनाचा जयघोष; विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा
Published on

अक्कलकोट तालुक्यात विविध उपक्रम
अक्कलकोट : तालुक्यात ८०वा भारतीय स्वातंत्र्यदिन देशभक्तीच्या उत्साहात साजरा करण्यात आला. शासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालये, बँका, पोलिस ठाणी आणि विविध संस्थांमध्ये ध्वजारोहणासह सांस्कृतिक कार्यक्रम, तिरंगा रॅली, एनसीसी विद्यार्थ्यांचे संचलन, कवायती व प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले.
अक्कलकोट तहसील कार्यालयात तहसीलदार विनायक मगर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पंचायत समिती कार्यालयात सभापती रश्मी हिप्परगी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
अक्कलकोट उत्तर व दक्षिण पोलिस ठाणे, भाजप कार्यालय तसेच शिवसेना कार्यालयातही ध्वजारोहण झाले. शाळा-महाविद्यालयांतील देशभक्तिपर कार्यक्रम, एनसीसी संचलन आणि तिरंगा रॅलीने वातावरणात उत्साह निर्माण केला. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ आणि ‘जय हिंद’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com