पुठ्ठा व कागदापासून तीस फुट उंच इस्रो रॉकेटच्या प्रतिकृतीवर फडकवला पन्नास फुट उंचीवर तिरंगा

पुठ्ठा व कागदापासून तीस फुट उंच इस्रो रॉकेटच्या प्रतिकृतीवर फडकवला पन्नास फुट उंचीवर तिरंगा
National Flag in Sangavi
National Flag in SangaviSakal
Summary

पुठ्ठा व कागदापासून तीस फुट उंच इस्रो रॉकेटच्या प्रतिकृतीवर फडकवला पन्नास फुट उंचीवर तिरंगा

जुनी सांगवी - दापोडी येथील सुधिर जम या तरूणाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कागद व पुठ्ठा यापासून तीस फुट उंचीच्या इस्रोच्या एलव्हीएम३ या रॉकेट लॉंचर मशीनची प्रतिकृती तयार केली होती. यावर पन्नास फुट उंचीचा फडकवलेला तिरंगा राष्ट्रध्वज परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेत होता. परिसरातून ही प्रतिकृती पाहाण्यासाठी नागरिकांची दिवसभर गर्दी होती.

अवकाश संशोधन व गृह ता-यांबद्दल इस्रोचा जग भरात नावलौकिक होत आहे. भारतीय शास्त्रज्ञ अनेक अभिनव यशस्वी प्रेक्षेपण व चंद्रयान सारख्या अनेक मोहिमा यशस्वीपणे राबवत असून भारताचे नाव जगभर होत असल्याने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विद्यार्थी पालक व नागरिकांना इस्रो व भारताच्या संशोधन क्षेत्रातील विविध कामगिरी बद्दल या प्रतिकृतीतून माहीती देण्याचे काम करण्याचा उद्देश होता, असे सुधिर जम याने सांगितले. दापोडी येथील अत्तार विटभटृटी परिसरात राहणारे सुधिर जम शोई फिनिशिंग या कंपनीत ड्राफ्टसमन मॅकेनिक म्हणून नोकरी करतात.

विज्ञान व कलेची आवड असल्याने कामातून घरी आल्यावर पत्नी रेखा जम, मित्र सुशिल सोनकांबळे, धर्मेंद्र क्षिरसागर यांच्या मदतीने वीस दिवस ही प्रतिकृती बनवायला लागले. १५ ऑगस्ट स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी अत्तार विटभट्टी दापोडी परिसरात तीस फुट उंचीचे एलव्हीएम ३ एक्स मिशनची प्रतिकृती व त्याच्यावर पन्नास फुट उंचीवर तिरंगा राष्ट्रध्वज फडकविणात आला. या प्रतिकृतीवर राष्ट्रीय प्रतिके, अशोक चक्र, सिंह मुद्रा, एलएमव्ही ३ याबाबत माहिती व विद्यूत रोषणाई करण्यात आली होती. सोबत इस्रोच्या आजवर राबविलेल्या मोहिमा, चांद्रयान दोन व तीन, सॅटेलाईट प्रेक्षेणाबाबत विद्यार्थी, नागरिकांना भित्तीचित्रांद्वारे माहीती देण्यात आल्याचे सुधिर जम यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांसह सर्व सामान्य नागरिकांनाही भारतीय शास्त्रज्ञ व इस्त्रोच्या संशोधनाबद्दल माहीती व्हावी. हा यामागील हेतू आहे.दिवाळी ,गणपती उत्सवात ही अशा विविध विषयांवर प्रतिकृती साकारून उत्सव साजरा करण्याचा आमचा प्रयत्न असतो. या कामात घरची मंडळी व मित्रांचेही सहकार्य मिळते.

- सुधिर जम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com