लोणावळ्यात स्वातंत्र्यदिनाचा उत्सव

लोणावळ्यात स्वातंत्र्यदिनाचा उत्सव
Published on

लोणावळा, ता. १६ : लोणावळा परिसरात विविध उपक्रमांनी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयांमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रध्वजास मानवंदना देत उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजवंदन करण्यात आले. तसेच लोणावळ्यासह कार्ला, मळवली, कुसगाव बु. ग्रामीण भागातील ग्रामपंचायती, विविध शाळांमध्ये ध्वजवंदन उत्साहात करण्यात आले.
लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने आयोजित मुख्य कार्यक्रमात नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष देविदास कडू, मुख्याधिकारी अशोक साबळे, नगरसेवक, आजी-माजी राजकीय पदाधिकारी, नगरपरिषदेचा कर्मचारी वर्ग उपस्थित होता. याप्रसंगी माजी सैनिक, आणीबाणीच्या काळामध्ये ज्या नागरिकांनी तुरुंगवास भोगला असे नागरिक तसेच लोणावळ्यात आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदत करणाऱ्या विविध सामाजिक संघटनांचा यावेळी सन्मान करण्यात आला. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेच्या वतीने आकर्षक ‘लेझर शो’ चे आयोजन करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लोणावळा स्क्वेअर मॉलशेजारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रवी पोटफोडे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. शहर काँग्रेसच्या वतीने गवळीवाडा येथील श्रीराम मंदिर येथे शहराध्यक्ष राजू गवळी यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले.
भाजपच्या वतीने इंद्रायणीनगर येथील भाजप कार्यालय येथे माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने रमेशचंद्र नय्यर यांच्या निवासस्थानी ज्येष्ठ सदस्य दत्तात्रय गोसावी यांनी ध्वजवंदन केले.
लोणावळा ग्रामीण व शहर पोलिस दलाच्या वतीने उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. आयएनएस शिवाजी नौदल प्रशिक्षण केंद्रात बँड पथकाच्या वतीने सुरेल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. खंडाळा पोलिस प्रशिक्षण केंद्र, सर्व लायन्स क्लब, रोटरी क्लब याचबरोबर विविध सामाजिक संघटनांच्या वतीने उत्साहात ध्वजवंदन झाले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com