Independent Municipal : पुण्याला 'क' दर्जाच्या स्वतंत्र महापालिकेची गरज - संजय बालगुडे

मुंबई महापालिका विस्तार वाढल्याने त्यांच्या 6 महापालिका झाल्या, त्याच धर्तीवर पुणे महापालिका हद्द वाढल्याने हडपसर ही "क" दर्जाची स्वतंत्र महापालिका करावी.
sanjay-balgude
sanjay-balgudesakal

पुणे - मुंबई महापालिका विस्तार वाढल्याने त्यांच्या 6 महापालिका झाल्या, त्याच धर्तीवर पुणे महापालिका हद्द वाढल्याने हडपसर ही "क" दर्जाची स्वतंत्र महापालिका करावी, त्यामुळे महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांचा विकास होऊ शकेल, याबाबत मुखमंत्री कार्यालयास पत्र दिले आहे, असे प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस संजय बालगुडे यांनी शुक्रवारी सांगितले.

राज्य सरकारने काही महिन्यापूर्वीच उरुळी देवाची - फुरसुंगी महापालिकेतून वगळून त्यांची स्वतंत्र नगरपालिका केली आहे. या पार्श्भूमीवर, बालगुडे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. बालगुडे म्हणाले," मागील काही वर्षात पुणे महापालिका येथे 37 गावे समाविष्ट केले. त्यामुळे पुणे महापालिकेची हद्द मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

मुंबई महापालिकेची निवडणूक हद्द वाढण्यात आली. त्यापाठोपाठ पनवेल, नवी मुबई, वसई विरार, मिरा भाईंदर यासह 6 महापालिका झाल्या आहेत. मात्र आता मात्र पुणे महापालिकेत 37 गावे आणली, आता कचरा, पाणी व अन्य असे प्रश्न प्रलंबित आहेत."

sanjay-balgude
Load Shading : पुण्यात अघोषित भारनियमन! दररोज किमान एक ते दोन तास वीज पुरवठा होतो खंडित

म्हणून स्वतंत्र महापालिका गरजेची असे सांगून बालगुडे म्हणाली 'पुणे महापालिका विभाजनाची गरज आहे. हडपसर. महापालिका स्वतंत्र करावी. अधिकारी व कर्मचारी यांच्यावर परिणाम होऊ लागला आहे. हद्द वाढते, पण उत्पन्न आहे तेवढे. 2017 ला 6 हजार कोटी, बजेट. आता साडे आठ हजार कोटी बजेट. 38 गांवाना दर्जाचा कर लावावा, अशी मागणी होत आहे. 2015 ला सभा दिला होता, तो विषय आज ही प्रलंबित. महापालिका होण्याची आज गरज आहे. लोकसंख्या 50 लाखा पर्यंत.गेली, 'क' दर्जाची महापालिका करावी, अशी मागणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी केली आहे.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com